Mahadayi Water Dispute: ‘आरजी’चा खरा चेहरा समोर!

आझाद मैदानातील पत्रकारिषदेत सहा पक्षांच्या नेत्यांचा आरोप
Mahadayi Water Dispute In Goa
Mahadayi Water Dispute In Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हादई वाचविण्यासाठी राज्यात आंदोलन होऊ नये, म्हणून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष वावरत आहे. त्या पक्षाचा खरा चेहरा आता जनतेसमोर आलेला आहे. या पक्षाला भाजपचीच फूस असल्याचा आरोप सहा पक्षांच्या राज्यातील नेत्यांनी शनिवारी जाहीरपणे केला.

आझाद मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा, तृणमूल काँग्रेस समिल वळवईकर, आम आदमी पक्षाचे ॲड. अमित पालेकर आणि शिवसेनेचे जितेश कामत या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Mahadayi Water Dispute In Goa
Vishwajeet Rane : नवीन मैदानाचे उद्‌घाटन; खेळाडूंना मिळणार लाभ

आरजीवाल्याने फूट पाडण्यासाठी जी भूमिका घेतली आहे, ती त्यांच्यासाठी नक्कीच धोक्याची ठरू शकते. जर तो पक्ष वेगळे राहत असेल तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे, असा सवालही या नेत्यांनी उपस्थित केला. आरजीचा हायकमांड कोण, हे सर्वांना माहीत आहे. म्हादई वाचविण्यासाठी एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी पुढे आले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. आम्ही सर्वजण साखळीच्या सभेवर लक्ष केंद्रीत केले आहे.

Mahadayi Water Dispute In Goa
Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीमुळे डिचोली बाजार फुलांनी बहरला

भाजपची अंतर्गत फूस-

म्हादई वाचविण्यासाठी आरजी पक्ष वेगळ्या मार्गाने जात असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर या नेत्यांनी सांगितले की, आरजीचे नेते राज्यात म्हादईसाठी आंदोलन होऊ नये, म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांना भाजपचीच अंतर्गत फूस आहे, त्यांना जर म्हादई वाचावी असे वाटत असते तर ते एकत्रित आले असते. गोमंतकीय म्हणून म्हादई वाचविण्याचा एकत्रितरित्या प्रयत्न होत असताना ‘आरजी‘वाले वेगळा अजेंडा चालवीत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com