Viral on Social Media : गोव्यातील महिलेच्या फोटोमुळे वाद का? 'कोहली, वर्मा हे गोव्यात घर विकत घेतात आणि...'

गोव्यामधील एका महिलेची प्रतिमा दाखवणारा फोटो सध्या वेगळ्याच वादाचं कारण ठरतोय.
Viral on Social Media
Viral on Social MediaDainik Gomantak

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवणं अगदी सहज शक्य झालं आहे. तुमच्या कोणत्याही सोप्या, अवघड आणि कितीही किचकट प्रश्नाचं उत्तर या एआयकडे आहे. यातच सध्या माधव कोहली नावाच्या एका कलाकाराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने काढलेली पोर्ट्रेट्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. भारतातल्या विविध राज्यातील पुरुष आणि स्त्रियांची प्रातिनिधीक स्वरुपातील पोर्ट्रेट्स कोहली यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. मात्र गोव्यामधील एका महिलेची प्रतिमा दाखवणारा फोटो सध्या वेगळ्याच वादाचं कारण ठरतोय.

या फोटोवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवत गोव्यातील महिलांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवत ती मलीन केल्याचं म्हटलंय. काही लोकांनी तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. एका महिलेनं तर यावर कमेंट करत या स्टिरिओटाईपला बाहेरुन येऊन गोव्यात स्थायिक झालेल्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

ही प्रतिमा हुबेहुब वर्मा, शर्मा, कपूर, राठोड आणि इतर भारतीयांसारखी दिसते जे गोव्यात प्रॉपर्टी खरेदी करतात आणि गोवेकर असल्याचं भासवतात असंही या महिलेनं म्हटलं आहे.

Viral on Social Media
Goa Beach Party : '...तर गोव्यात येऊन काय फायदा?'; रात्री 10 नंतर पार्ट्या बंदच्या निर्णयामुळे पर्यटक नाराज

याआधीही अशाच प्रकारे गोव्यातील महिलांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार घडला होता. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात गोव्याचं प्रतिनिधीत्व करणारी महिला पँट शर्ट घालून हॅलो गोवा म्हणताना दिसतेय. या व्हिडीओवरुनही नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. गोव्याबाहेरुन येऊन गोव्यात स्थायिक होणाऱ्यांमुळे सातत्याने गोव्याची प्रतिमा मलीन होत असल्याच्या कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com