गोव्यात बीचवरील पार्टीमध्ये रात्री 10 नंतर संगीतावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. सरकारच्या या नियमाबाबत अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हरमीत आणि वीणा सिंग हे जोडपे हनिमूनसाठी नोएडाहून गोव्याला आले तेव्हा त्यांना हे फारसे माहीत नव्हते की रात्री 10 वाजताच्या आवाजाच्या बंदीमुळे समुद्रकिनाऱ्यावरील शॅकवर पहाटेपर्यंत पार्टी करण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळतील. “हम गोवा में तो पार्टी करने ही आये थे, अन्यथा आम्ही कुठेही जाऊ शकलो असतो,” असे त्या जोडप्याने सांगितले. हेच मत अनेक पर्यटकांचे देखील आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अंमलात आणलेल्या रात्री 10 वाजताच्या बंदीमुळे गोव्यात निराश पर्यटकांची गर्दी दिसून आली आहे. ही बंदी उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली असून, परवानगीच्या वेळेपेक्षा मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
रात्री उशिरा मोठ्या आवाजात संगीत वाजवण्याविरोधात स्थानिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हा आदेश देण्यात आला आहे. “नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन वाढले असल्याचे लक्षात आले आहे,” असे उच्च न्यायालयाच्या निवेदनात म्हटले आहे. पण, शांत झोपेने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असताना, पर्यटन उद्योगाला या बंदी फटका बसणार का? हे जाणून घेणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.
रात्री 10 वाजता पार्ट्या संपल्यामुळे पार्टी हॉपर्स नाखूष
समुद्रकिनाऱ्याजवळ पार्टी करण्याचे पर्यटकांचे बेत उधळले गेल्याने अनेक पर्यटक हताश झाले आहेत. “गोवा त्याच्या समुद्रकिनारे आणि त्याच्या थंड वातावरणासाठी ओळखले जाते, पण जर तुम्ही 10 वाजता संगीत बंद केले तर गोव्यात येऊन काय फायदा? आम्ही नवीन वर्षाच्या आसपास लांब सुट्टीसाठी येथे आलो आहोत आणि ही बंदी लागू होणार हे जाणून खरोखर निराश झालो आहोत,” असे दिल्ली येथील एका पर्यटकाने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.