Karnataka to Goa Pig Transport
Karnataka to Goa Pig TransportDainik Gomantak

Illegal Pig Transport: कर्नाटकातून गोव्यात 53 डुकरांची बेकायदेशीर वाहतूक! अमानवीय वागणूकीचा ठपका; युवकाला दंड

Karnataka to Goa Pig Transport: न्यायाधीश पूर्वा नाईक यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२५ सह ३(५) नुसार प्राण्यांशी अमानवीय वागणूक केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली.
Published on

पणजी : कर्नाटकातून गोव्यात विनापरवाना ५३ डुकरांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी सत्तरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जीवन शिप्री (वय २२, रा. कर्नाटक) याला २,०५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याने हा निकाल देण्यात आला.

न्यायाधीश पूर्वा नाईक यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२५ सह ३(५) नुसार प्राण्यांशी अमानवीय वागणूक केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली. ठोठावलेला दंड तीन दिवसांत भरला नाही, तर आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Karnataka to Goa Pig Transport
Illegal Construction: माजी नगरसेवकासह मुख्य अधिकाऱ्यांना नोटीस, कुंकळ्ळीत बेकायदेशीर बांधकाम प्रकरण; शेतजमिनीत दोन बंगले

ही घटना २७ जानेवारी २०२५ रोजी केरी–सत्तरी येथील सीमा तपासणी नाक्यावर उघडकीस आली. पोलिसांनी दोन वाहने अडवली असता, एका वाहनात २३ आणि दुसऱ्या वाहनात ३० अशी एकूण ५३ जिवंत डुकरे अत्यंत अस्वच्छ व कोंदट स्थितीत वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या वाहतुकीसाठी आरोपीकडे कोणतीही वैध परवाने किंवा कागदपत्रे नव्हती.

Karnataka to Goa Pig Transport
Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

सुनावणीदरम्यान आरोपीने पहिल्याच वेळी आपला गुन्हा मान्य केला. न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप, गांभीर्य आणि संभाव्य शिक्षेबाबत माहिती दिल्यानंतर त्याची कबुली स्वीकारून निकाल सुनावला. दंडाची रक्कम राज्य सरकारकडे जमा करण्याचे आदेश आरोपीला देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com