Goa Paragliding: पॅराग्लायडिंग करताना दोरी तुटून दोघे कोसळले दरीत, पुण्यातील पर्यटक युवतीसह पायलट ठार

Querim Paragliding Accident Death: पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले.
Illegal paragliding accident Querim beach
Paragliding accident GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Paragliding Accident Woman Tourist Death

मोरजी: केरी (पेडणे) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर पॅराग्लायडिंग व्‍यवसायाची पोलखोल आज झाली. केरी समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले.

पुणे येथील काही पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी केरी डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेले होते. त्यावेळी पायलट सुमन नेपाळी आणि पुणे येथील पर्यटक शिवानी दाभळे हे दोघे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी मांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.

Illegal paragliding accident Querim beach
Goa Tourism: गोव्यातील 'हे' ऐतिहासिक ठिकाण आहे Perfect Photography Spot; तुम्ही कधी भेट देताय?

शिवानी ही मित्रासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आली होती. पर्यटनाचा एक भाग म्हणून पॅराग्लायडिंग करावे, या हेतूने ती डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेली. त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने पॅराग्लायडरची एक दोरी मध्येच तुटल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेचा पंचनामा मांद्रे पोलिसांनी केला.

हा पॅराग्लायडर शेखर रायजादा नामक व्यक्तीचा होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हरमल तसेेच केरी भागात बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय केला जात असल्याचे सांगण्यात आले. येथील काही नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पॅराग्लायडिंगला आमचा विरोध असून तशा प्रकारचा ठराव मंजूर करूनही सरकारने अशा पॅराग्लायडिंग व्यवसायिकांना परवाने का दिले? कुणाला परवाने दिले? याची सविस्तर माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

बेकायदा व्यावसायिकांना अटक करा : जीत आरोलकर

याविषयी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर म्हणाले की, किनारी भागात पॅराग्लायडिंगला माझा सुरुवातीपासूनच विरोध होता. मी पर्यटन खाते आणि पर्यटन मंत्र्यांनाही तसे कळविले होते. शिवाय केरी पंचायतीलाही सूचना केल्या होत्या. त्यानुसार केरी पंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून पॅराग्लायडिंगवर निर्बंध घालण्याचा ठराव मंजूर केला. कोस्टल पोलिसांनाही याविषयी सूचना केल्या होत्या. आजची घटना घडली, त्या व्यावसायिकाने जर परवाने घेतले नसतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

लोकवस्तीवर पॅराग्लायडरच्या घिरट्या

पॅराग्लायडिंगबाबत स्थानिकांच्या अनेक तक्रारी असून लोकवस्तीवर हे पॅराग्लायडर घिरट्या घालतात. त्यामुळे येथील लोकांना त्रास होतो. अनेकदा पॅराग्लायडरच्या मोटरचा आवाज रुग्णासाठी त्रासदायक ठरतो. गेल्यावर्षी अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून लाच घेताना दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. मात्र, आजच्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

खोल दरीतून काढले दोघांना बाहेर

या डोंगर पठारावर कित्येक पर्यटक जीव गमावून बसले असून अनेकजण जायबंदीही झाले आहेत. आज जी दुर्घटना घडली, त्या दरीतून दोघांना बाहेर काढण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागले. ही दरी बरीच खोल असून येथे उतरणे आणि पुन्हा वर येणे बरेच अवघड तसेच जीवघेणे असल्याचे स्थानिक नागरिक यशवंत केरकर यांनी सांगितले.

Illegal paragliding accident Querim beach
Drowning Death: वर्षभरात 92 जणांचा बुडून मृत्य, केवळ 5 जणांना जीवनदान; पणजीचा आकडा सर्वाधिक?

पंचायतीच्या ठरावाला ‘केराची टोपली’

केरी पंचायतीने काही महिन्यांपूर्वी केरी समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या पॅराग्लायडिंगला मनाई करणारा ठराव सर्वानुमते मंजूर केला होता. तो ठराव संबंधित खात्याला सुपूर्द केला असला तरी त्या ठरावाला सध्या केराची टोपली दाखविल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Illegal paragliding accident Querim beach
Tragic Death: फॅमिलीसोबतची ट्रीप ठरली अखेरची; गोव्यातून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा रस्त्यातच मृत्यू

परवाना एकच; व्यावसायिक अनेक

१. याविषयी स्थानिकांकडे संपर्क साधला असता, धक्कादायक माहिती हाती आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरी येथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी शेखर रायजादा या एकाच व्यक्तीकडे परवाना आहे. मात्र, सात ते आठजण बेकायदेशीरपणे हा व्यवसाय करतात.

२.काही दिवसांपूर्वी पर्यटन खात्याचे अधिकारी शॅक व इतर व्‍यवसायांची पाहणी करण्यासाठी केरी येथे आले होते, तेव्हाही हे बेकायदा पॅराग्लायडर आकाशात उडत होते. पॅराग्लायडींगला नेण्याआधी पर्यटकाकडून कोणतेही ओळखपत्र घेतले जात नाही. १० मिनिटांच्या एका राईडसाठी ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात.

३. श्री देव आजोबा देवस्थानमागे असलेल्या तामळ नावाच्या डोंगरावरून हे पॅराग्लायडर उडविले जाते. वाऱ्याच्या दिशेवर सारे ठरते. कित्येकदा पॅराग्लायडर किनाऱ्यावरही उतरतात. बहुतेकवेळा ते डोंगरावर उतरतात. डोंगरावर बहुतांश जागा पठाराची असली ती खडकाळ आहे.

४. येथील खडकावर आपटून आज दोघांचा जीव गेला. सकाळी साडेअकरा ते सूर्यास्तापर्यंत पॅराग्लायडींगची सोय उपलब्ध असते. आज वारा नव्हता. तरीही पॅराग्लायडर उडविले गेले आणि ते आदळले, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. मात्र, हे उघड होऊ नये यासाठी दोरी तुटल्याचा बनाव करण्यात आला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com