Drowning Death: वर्षभरात 92 जणांचा बुडून मृत्य, केवळ 5 जणांना जीवनदान; पणजीचा आकडा सर्वाधिक?

Goa Drowning Death: सर्वाधिक घटनांची नोंद पणजी शहर तसेच आजूबाजूच्या परिसरांमधून झाली आहे
Drowning Cases Goa
Drowning Death Report Dainik Gomantak
Published on
Updated on

Death by Drowning in Goa in 2024

पणजी: गेल्या वर्षातभरात गोव्यात अनेक खळबळजनक घटना घडल्या आहेत. यांपैकीच एक म्हणजे गेल्या वर्षभरात ९२ जणांचा बुडून झालेला मृत्यू. राज्यातील समुद्र, नदी आणि इतर पाणथळ प्रदेशांमधून एकूण ९२ मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामधील सर्वाधिक घटनांची नोंद पणजी शहर तसेच आजूबाजूच्या परिसरांमधून झाली आहे.

बुडून मृत्यू झालेल्या या घटनांमध्ये आत्महत्यांचा देखील समावेश होतो. गेल्या वर्षात पणजी आणि आजूबाजूच्या भागांमधून १३ बुडून मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे अग्निशामक दलाकडून केवळ ५ व्यक्तींना बुडण्यापासून वाचवण्यात यश मिळाले आहे.

Drowning Cases Goa
Deaths by Drowning in Goa: राज्यात वर्षभरात 36 जणांचा बुडून अंत; जुलै महिन्यात 6 जणांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात अग्निशामक दलाला एकूण १४८ कॉल्स आले होते, पैकी ९२ जणांनि जीव गमावला तर ५ जीवांना वाचवण्यात अग्निशामक दल यशस्वी झाले.

बुडून मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये पणजी सर्ववत अव्वल स्थानी आहे तर यानंतर सावर्डे, जुने गोवे, मडगाव, लोटली, म्हापसा, केपे आणि मुळगाव अशा भागांचा समावेश होतो. या भागांमधून एकूण २३ मृत्यू झाल्याची बातमी उघड झाली आहे. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या काळात गेल्यावर्षी गोव्यात पोहायला गेलेल्या २७ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. याशिवाय काणकोण, कांदोळी कुठ्ठाळी, कुडचडे,हणजूण, असोळना, बाणावली, कळंगुट येथून देखील बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com