Sameer Panditrao
उत्तर गोवा फिरण्याच्या लिस्ट मधले एक महत्वाचे ठिकाण म्हणजे आग्वाद किल्ला
अग्वादा किल्ला हा एक पोर्तुगल वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल.. पोर्तुगीजांनी साधारण 16 व्या शतकामध्ये हा किल्ला बांधला होता
या किल्ल्यावर बांधण्यात आलेला लाईट हाऊस हा आशिया खंडातील सर्वात जुना लाईट हाऊस आहे आणि फोटोग्राफीसाठी एक प्रेक्षणीय स्पॉट.
हा लाईट हाऊस अगदी उत्तम अवस्थेत आजही उभा आहे पर्यटकांना या लाईट हाऊस जवळ फोटो काढण्याचा मोह आवरत नाही
या किल्ल्याच्या मध्यभागात तळघरांमध्ये एक जेल कोठडी आहे.
हा किल्ला एक भुईकोट प्रकारातील किल्ला आहे जो एका टेकडीवर बांधलेला आहे, त्यामुळे यावर चढाई करणे सोपे आहे..
एका बाजूला मांडोवी नदी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र अशा दोन्हींच्या संगमावर हा किल्ला वसलेला आहे.