Illegal Minning in Goa: पिसुर्लेत बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन

परवान्याचा होतोय गैरवापर : वाळपई उपजिल्हाधिकाऱ्यांकडे हनुमंत परब यांची तक्रार
Illegal Minning in Goa
Illegal Minning in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Minning in Goa: पिसुर्ले येथे ई-लिलावाखाली खरेदी केलेला खनिज माल उचलण्याबरोबरच तेथे खनिज उत्खनन करून त्याची ट्रकने वाहतूक केली जात असल्याची तक्रार देऊळवाडा-पिसुर्लेचे समाजसेवक हनुमंत परब यांनी वाळपई उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे.

या ठिकाणी खाण खात्याचे अधिकारी फिरकत नसल्याने त्याचा फायदा उठवून हे काम सुरू असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Illegal Minning in Goa
Illegal Mining in Goa: कुडणेत अवैध खाण व्यवसायावर डिचोली पोलिसांची कारवाई; 31 ट्रक जप्त

पिसुर्ले गावातील टी.सी. क्रमांक ५५/५ मध्ये ई-लिलावाखाली खरेदी केलेला खनिज माल उचलण्याचे काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. ९ मार्च २०२३ रोजी खाण खात्याने मे. अमित अर्थमुव्हर्स या कंपनीला त्यातील ३२ हजार मेट्रीक टन उचलण्यासाठी परवानगी दिली आहे.

मात्र, ही कंपनी दिलेल्या परवान्यानुसार खनिज माल उचलण्याबरोबरच तेथील साठा करून ठेवलेल्या खनिजाचे उत्खननही केले जात आहे.

खाण खात्याने हा साठा करून ठेवलेला खनिज माल उचलण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे होत असलेले खनिज उत्खनन हे बेकायदेशीर व अनधिकृत आहे, असे परब यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Illegal Minning in Goa
Mapusa Municipality Budget 2023: नगरसेवकांच्या हरकतींनंतर अंदाजपत्रकात केली सुधारणा

खाण अधिकाऱ्यांनी शहानिशा करावी

या ठिकाणी बेकायदा खनिज उत्खनन करून त्याची वाहतूक करण्याचे प्रकार सुरू असल्याने खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी ते रोखावे, अशी विनंती तक्रारदाराने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

हल्लीच उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेत या खनिजवाहू ट्रकांना पिसुर्लेतून जाताना काही अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी होते की नाही याचीही खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करावी, असे त्यात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com