Goa Made Liquor Seized
Goa Made Liquor SeizedDainik Gomantak

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Made Liquor Seized: गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणली जात असलेली दारू वाहतूक रोखण्यासाठी बांदा पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलीय.
Published on

सिंधुदुर्ग: गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणली जात असलेली दारू वाहतूक रोखण्यासाठी बांदा पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. इन्सुली चेकपोस्टवर सोमवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या तपासणीत १ लाख ८० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी मुन्ना जानी शेख (वय ५०, रा. आंध्र प्रदेश) आणि शरणकुमार व्यंकटराव कोम्मालपाटी (वय २५, रा. तेलंगणा) या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघेही दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Goa Made Liquor Seized
Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

बांदा पोलिसांनी इन्सुली चेकपोस्टवर नियमित वाहन तपासणी दरम्यान ही कारवाई केली. सोमवारी रात्री उशिरा गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या एका पिकअप टेम्पोला संशयाच्या आधारे थांबविण्यात आले.

वाहनाची तपासणी केली असता, त्यात १०० बॉक्समध्ये सुमारे १,२०० गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दारू वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Goa Made Liquor Seized
Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

राज्यात दारूची मागणी वाढत असल्याने बेकायदा वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बांदा पोलिसांकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com