सरपंचपदी गिरीश पिल्ले यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

या प्रकल्पाला (project) कायदेशीर (Legal) स्वरुप आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पिल्ले म्हणाले.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर विजयी मुद्रेत आपल्या पंच सदस्यांसह सरपंच गिरीश पिल्ले.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर विजयी मुद्रेत आपल्या पंच सदस्यांसह सरपंच गिरीश पिल्ले.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: सांकवाळ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) सरपंचपदी गिरीश पिल्ले (Girish Pillay) यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. आज घेण्यात आलेल्या सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत उपस्थित 11 पैकी 9 पंच सदस्यांनी गिरीश पिल्ले यांच्या बाजूने कौल देऊन त्यांना सांकवाळ पंचायतीच्या सरपंचपदी निवडून आणलं. या मतदानाच्यावेळी रमाकांत बोरकर आणि सुनीता बोरकर हे दोन्ही पंच सदस्य गैरहजर राहिले.

सांकवाळ पंचायतीच्या पंच सदस्यांना विश्वासात न घेता विकास कामांना अडथळे आणत असल्याचे कारण पुढे करून 5 ऑक्टोबर रोजी सांकवाळ पंचायतीच्या 11 पंच सदस्यीय मंडळापैकी 9 पंच सदस्यांनी सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरोधात मुरगावचे गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात सरपंच रमाकांत बोरकर (Ramakant Borkar) हे इतर पंच सदस्यांना विश्वासात घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. तसेच पंचायत (Panchayat) क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात बोरकर अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला होता.

सरपंचपदी निवड झाल्यानंतर विजयी मुद्रेत आपल्या पंच सदस्यांसह सरपंच गिरीश पिल्ले.
विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना न घेतल्याने ढवळीकर आक्रमक

दरम्यान आज सरपंचप निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष बैठकीस सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. सरपंचपदासाठी गिरीश पिल्ले यांचा एकच अर्ज सादर करण्यात आला.त्यानुसार पिल्ले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. कायद्यानुसार (Act )अर्जद्वाराविरुध्द फारकत घेण्यासाठी सदस्यांना निर्वाचन अधिकारी (Officer) एल्विस फिग्रेदो यांनी वेळ दिला.मात्र कुणीही फारकत न घेतल्याने निर्वाचन अधिकाऱ्यांनी गिरीश पिल्ले यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

सरपंच पदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश पिल्ले म्हणाले, माझा हा आजचा विजय हा विकासासाठी आहे आणि म्हणूनच मला सरपंचपदी पुन्हा निवडून आणण्यासाठी 8 पंच सदस्यांनी विश्र्वास दाखवला. गावातील सर्व प्रलंबित विकासावर आता मी लक्ष केंद्रित करणार आहे. प्रामुख्याने झुआरीनगर तसंच सांकवाळचा विकास घडवून आणणार आहे.

सरपंच रमाकांत बोरकर यांच्या कारकीर्दीतील सांकवाळ क्षेत्रातील MRF चा कचरा प्रकल्प हा बेकारदेशीर असल्याचं पिल्ले यांनी मान्य केलं. या प्रकल्पात काय त्रुटी आहेत त्या तपासून, सुधारणा करण्यात येईल आणि हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येईल. कारण या प्रकल्पावर पंचायतीचे लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. हा प्रकल्प लोकांच्या पैशाने उभारण्यात आला आहे. तेव्हा या प्रकल्पाला (project) कायदेशीर स्वरुप आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पिल्ले शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com