Chopdem: शेतातील पाणी कसे मिळणार? शापोरात ओहोळावर बेकायदा बांधकाम; स्थानिक, शेतकरी चिंताग्रस्त

Chopdem Chapora Illegal Construction: शापोरा नदी परिसरात मिठाचे आगार आहे तिथून वाहणारा ओहोळ मागच्या सहा महिन्यापूर्वी लोखंडी सळ्या टाकून काँक्रिट घालून अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे.
Chopdem Chapora Illegal Construction
Chopdem Chapora Illegal ConstructionDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: आगरवाडा चोपडे पंचायत क्षेत्रात शापोरा नदी किनारी परिसरात ज्या ठिकाणी मिठाचे आगार आहे तिथून वाहणारा ओहोळ मागच्या सहा महिन्यापूर्वी लोखंडी सळ्या टाकून काँक्रिट घालून अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या संदर्भात पंचायतीने जलसिंचन खात्याच्या पेडणे विभागीय कार्यालयात तक्रार दिल्यानंतर या घटनेचा अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असला तरी अद्याप कुठली कारवाई केलेली नाही.

१८ रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबत ग्रामस्थांनी पंचायतीला जाब विचारला होता. उपसरपंच शिल्पा नाईक व स्थानिक पंच संगीता नाईक यांनी या विषयी पंचायतीमार्फत जलसिंचन विभागाला तक्रार दिली आहे, असे सांगितले.

परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अन्यथा ग्रामस्थांनाच पुढाकार घेऊन कारवाई करावी लागेल, असा इशारा यावेळी दिला. एका बिगर गोमंतकीयाने या ओहोळाच्या परिसरातील जागा विकत घेऊन त्या ठिकाणी बांधकाम करण्यास पुढाकार घेतला आहे.

Chopdem Chapora Illegal Construction
Bicholim River: मान्सूनपूर्वी डिचोली नदी होणार चकाचक! पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना; गाळ उपसण्याचे काम सुरु

यासाठी येथील ओहोळही बुजविण्यात येत आहे. या ओहोळाच्या परिसरात स्थानिकांची शेत जमीनही आहे. पावसाळ्यात या शेतीची मशागत केली जाते. पावसाळ्यात शेतातील पाण्याचा निचरा या ओहोळातून होतो, परंतु हा ओहोळ बुजविण्यात आल्याने शेतातील पावसाचे पाणी कसे जाणार, असा प्रश्‍न अनिल बगळी यांनी उपस्थित केला.

Chopdem Chapora Illegal Construction
Chapora: बेकायदा रेती उपसाकडे पोलिसांची डोळेझाक का? 'शापोरा'त स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये उलगडला धक्कादायक प्रकार

कारवाई करणार

याविषयी पेडणे जलसिंचन विभागाचे अधिकारी अनिल परुळेकर यांच्याकडे संपर्क साधला असता, या ओहोळाविषयी पंचनामा करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोचवलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अजून कोणता आदेश आलेला नाही. वरिष्ठांकडून आदेश मिळतात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com