Koparde Sattari: कोपार्डेत संतप्त ग्रामस्थांनी अडवला टेम्पो! ‘टाकाऊ चिकन’च्या ‘डंपिंग’वरुन बाचाबाची; पंचायतीचे दुर्लक्ष

Koparde Sattari Illegal Dumping: कोपार्डे-सत्तरी येथे खान नामक व्यक्तीच्या खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या गेल्या अनेक दिवसांपासून टाकाऊ चिकन सातत्याने उघड्यावर टाकण्याचा प्रकार घडत आहे.
Illegal chicken waste dumping At Koparde Sattari
Illegal chicken waste dumpingDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: कोपार्डे-सत्तरी येथे खान नामक व्यक्तीच्या खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या गेल्या अनेक दिवसांपासून टाकाऊ चिकन सातत्याने उघड्यावर टाकण्याचा प्रकार घडत आहे. या कचऱ्यामुळे या परिसरात घाणीचे सम्राज्य पसरले आहे. अनेकदा यासंबंधी ग्रामस्थांनी जमीन मालकाला सांगूनही खुलेआम हा प्रकार घडत आहे.

शनिवारी रात्री ११ च्या सुमारास एक टेम्पो कचरा टाकण्यासाठी आला असता ग्रामस्थांनी अडवला. त्यावेळी ग्रामस्थ आणि चालक यांच्यात बाचाबाची झाली. टाकाऊ चिकन टाकले जात असल्याने त्याचा त्रास लोकांना होत आहे. अनेकदा ग्रामस्थांनी पंचायतीकडे यासंबंधी तक्रारही केली आहे. मात्र कोणीच यावर कारवाई केली नाही.

मिळालेल्या माहिती नुसार पिसुर्ले सत्तरी येथील कचरा प्रकल्पात सदरचा कचरा देण्यात येतो. मात्र गेल्या काही काळापासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे खान यांनी आपल्या खासगी जागेत वेस्ट टाकण्याचे काम सुरू केले आहे. काल पकडलेली गाडीही मडगावची आहे. त्यामुळे हा खान गोव्यातील अनेकांना या परिसरात बेकायदेशीर रित्या डम्पिंग करण्यास मुभा देतो, असे निदर्शनात आले आहे.

Illegal chicken waste dumping At Koparde Sattari
Margao: हॉटमिक्सिंग केलेले रस्ते पुन्हा खणू देणार नाही, त्यापेक्षा पर्यायी व्यवस्था करा; आमदार रेजिनाल्ड यांचा इशारा

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन बेकायदतेशीर डंम्पिंग करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस निरिक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रथमेश गावस पुढील तपास करत आहे.

Illegal chicken waste dumping At Koparde Sattari
Sonsodo Dump: सोनसडो कचऱ्याला पुन्हा आग, सहा महिन्यांत चौथ्यांदा घडली घटना

अन्य जनावरांचाही टाकाऊ कचरा

रात्री झालेल्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर, घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच कचरा भरलेली गाडी होंडा येथे नेऊन परत कोपार्डे येथे आणली. वाहनात भरलेला कचरा चिकनचा आहे का, किंवा इतर हे पाहण्याची मागणी ग्रमस्थांनी केल्यानंतर कोपार्डे येथे वाहनातील कचरा खाली करण्यात आला. त्यात इतर जनावरांचाही टाकाऊ कचरा असल्याचे समजले. त्यात मृत वासरुही आढळल्याचे समजते. या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून उद्याप अहवाल मिळालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com