Buffalo Transport: कत्तलखान्यांसाठी बेकायदेशीररीत्या आणल्या 36 म्हशी! 3 वाहने, म्हशी जप्त; 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Illegal buffalo transport goa: गोव्यातील कत्तलखान्यांसाठी बेकायदेशीररीत्या आणण्यात येत असलेल्या म्हशींच्या वाहतुकीवर रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Illegal buffalo transport goa
Illegal buffalo transport goaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्यातील कत्तलखान्यांसाठी बेकायदेशीररीत्या आणण्यात येत असलेल्या म्हशींच्या वाहतुकीवर रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन वाहने आणि तब्बल ३६ म्हशी जप्त केल्या असून सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अनमोड परिसरात दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास संशयास्पद वाहने येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. स्थानिक ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून ही वाहने अडवली असता त्यामध्ये म्हशी कोंबून भरलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. यानंतर तत्काळ रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली.

रामनगर पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही वाहने ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात या म्हशी महाराष्ट्रातील गडहिंग्लज येथून गोव्यातील कत्तलखान्यांकडे अनमोडमार्गे आणल्या जात असल्याचे उघड झाले. प्रत्येक वाहनात १२ म्हशी अशा एकूण ३६ म्हशींची वाहतूक सुरू होती.

Illegal buffalo transport goa
Goa Accident: ढवळी येथे अपघातात दोन म्हशी ठार; साळगाव - कळंगुट रोडवरील अपघातात एक गंभीर जखमी

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडे महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असले तरी कर्नाटक राज्यातून वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही वाहतूक बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे.

Illegal buffalo transport goa
Goa Flood: उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले, उपासमारीची वेळ; पुरामध्ये वाहून गेल्‍या 11 दुभत्या म्हशी

या प्रकरणी रामनगर पोलिसांनी संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून जप्त करण्यात आलेल्या म्हशी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com