Goa Accident News In Marathi
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident: ढवळी येथे अपघातात दोन म्हशी ठार; साळगाव - कळंगुट रोडवरील अपघातात एक गंभीर जखमी

Goa Fatal Accident: गोव्यात अपघाताचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात दोन अपघात झाले आहेत.
Published on

पणजी: गोव्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी राज्यात दोन अपघातांची नोंद झाली. ढवळी येथे झालेल्या अपघातात दोन म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. तर, साळगाव - कळंगुट मार्गावर झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

ढवळी येथे अपघातात दोन म्हशी ठार

ढवळी येथील बगल रस्त्यावर झालेल्या कारच्या अपघातात दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे. अचानक धावत आलेल्या दोन म्हाशींना वेगाने आलेल्या कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की दोन्ही म्हशी जागीच ठार झाल्या. या अपघातात कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी (०५ जून) रात्री हा अपघात झाला.

Car Damaged Due To Accident
Car Damaged Due To AccidentDainik Gomantak
Goa Accident News In Marathi
Ambergris Smuggling: 10 कोटी रुपयांची व्हेलची उलटी जप्त; सिंधुदुर्ग आणि गोव्यातील तिघांना अटक

साळगाव - कळंगुट मार्गावर अपघात ; एक गंभीर जखमी

साळगाव - कळंगुट मार्गावर झालेल्या अपघातात ओमनीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरुद्ध दिशेला शुक्रवारी सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास हा अपघात झाला. दोन्ही वाहनात पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. रेन्टेड बलेनो आणि मारुती ओमनी यांच्यात हा अपघात झाला.

Baleno And Omni Car
Baleno And Omni CarDainik Gomantak
Goa Accident News In Marathi
Goa Vegetable Rates: महागाईचा भडका! गोव्यात भाजी, फळांचे दर दुप्पट; काय आहे बाजारभाव? वाचा..

बलेनो कार मडगाव येथून कळंगुटच्या दिशेने जात होती. या कराचा वेग खूप होता. तर, ओमनी कळंगुटवरुन साळगावच्या दिशेने जात होती. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरुद्ध दिशेला दोन्ही कारचा मोठा अपघात झाला. ओमनीचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साळगाव पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com