Ponda News: अवैध बाईक रेस बेतली जीवावर; फोंड्यातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी
Illegal Bike Racing AccidentDainik Gomantak

Ponda News: अवैध बाईक रेस बेतली जीवावर; फोंड्यातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी

Illegal Bike Racing: मोटार वाहन कायद्यातंर्गत फोंडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास केला जात आहे.
Published on

वेर्णा: बाईक रेसमध्ये फोंड्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, दुसरा एक तरुण जखमी झाला आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीत अवैध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या रेसमध्ये रविवारी (०८ डिसेंबर) सायंकाळी ही घटना घडली. अवैध रेस आयोजनावरुन पोलिस आणि आयोजकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मोहम्मद कैफ (वय २१, रा. फोंडा) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, शुभम बाबाजान पंडारी (वय २४, रा. दत्तवाडी, फोंडा) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोटार वाहन कायद्यातंर्गत फोंडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, अवैध बाईक रेस कशी आयोजित केली तसेच, पोलिसांचे लक्ष नव्हते का? असे प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

Ponda News: अवैध बाईक रेस बेतली जीवावर; फोंड्यातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी
स्वस्त iPhone चा मोह भोवला, गोव्यातील व्यक्तीला 22.24 लाखांचा गंडा; महाराष्ट्रातून एकास अटक

दोन वर्षापूर्वी रेसमध्ये मडगावच्या तरुणाचा झाला होता मृत्यू

एमआरएफ मोटोग्रीप सुपरक्रॉस ॲक्शन चॅम्पियनशीप स्पर्धेत रायडरचा मृत्यू झाल्याची घटना नोव्हेंबर २०२२ मध्ये उघडकीस आली होती. यात अल्ताब आलम हसन लाडजी (20, रा. घोगळ-मडगाव) याचा मृत्यू झाला होता. गोव्यातील ही पहिलीच घटना होती. यानंतर राज्यात आयोजित होणाऱ्या बाईक रेसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले.

Ponda News: अवैध बाईक रेस बेतली जीवावर; फोंड्यातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी
Siolim Cylinder Blast: शिवोलीत सिलिंडरचा स्फोट, भाडेकरु दाम्पत्य भाजले; उपचारासाठी जीएमसीत दाखल

अवैध बाईक रेसिंगवर कोण ठेवणार नियंत्रण?

राज्यात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने बाईक रेसिंग आयोजित केल्या जातात. याकडे पोलिस आणि प्रशासनाचे दुर्लेक्ष होताना दिसते. यापूर्वी देखील अवैध बाईक रेसिंगमध्ये अपघाताच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, अशा इव्हेंटवर नियंत्रण ठेवणे प्रशासन आणि पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com