स्वस्त iPhone चा मोह भोवला, गोव्यातील व्यक्तीला 22.24 लाखांचा गंडा; महाराष्ट्रातून एकास अटक
I-Phone Fraud CaseDainik Gomantak

स्वस्त iPhone चा मोह भोवला, गोव्यातील व्यक्तीला 22.24 लाखांचा गंडा; महाराष्ट्रातून एकास अटक

Goa Fraud Case: आयफोन न मिळाल्याने त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताला महाराष्ट्रातून अटक केलीय.
Published on

कोलवाळ: स्वस्तात आयफोन घेण्याचा मोह गोव्यातील एका व्यक्तीला भोवला आहे. महाराष्ट्रातील एका व्यक्तीने २२.२४ लाखांचा गंडा या व्यक्तीला घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन संशयित आरोपीला अटक केली आहे.

बळीराम म्हापणकर (वय ३१, रा. महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फसवणुकीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी ही कारवाई केली.

स्वस्त iPhone चा मोह भोवला, गोव्यातील व्यक्तीला 22.24 लाखांचा गंडा; महाराष्ट्रातून एकास अटक
Siolim Cylinder Blast: शिवोलीत सिलिंडरचा स्फोट, भाडेकरु दाम्पत्य भाजले; उपचारासाठी जीएमसीत दाखल

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलवाळ हद्दीतील एका व्यक्तीला संशयित बळीराम याने कमी दरात आयफोन देण्याचे आमिष दाखवले. संबधित व्यक्तीने आयफोनसाठी २२.२४ लाख रुपये देखील पाठवून दिले. दरम्यान, आयफोन न मिळाल्याने त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताला महाराष्ट्रातून अटक केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com