Union Budget 2025: IIT गोवावर मोठी अपडेट!! अर्थमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा; पण जागा निश्चित नसल्याने अनुदानाला मुकणार का?

IIT Goa Campus: आयआयटी गोवा एकही जागा निश्चित करू शकत नसल्याने विस्तार योजनांसाठी जाहीर झालेला निधी गोव्याला मिळेल की नाही यावर प्रश्नचिह्न कायम आहे
IIT Goa grant
IIT Goa grantDainik Gomantak
Published on
Updated on

IIT Goa: वर्ष २०१६ पासून स्थापन झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोवाला अद्याप जागा मिळत नाहीये, शनिवारी (१ फेब्रुवारी) रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या अनुदानांना संभाव्यपणे आयआयटी गोवा गमावेल अशी शक्यता आहे.

स्थापनेनंतर नऊ वर्ष उलटून देखील अजून आयआयटी गोवा एकही जागा निश्चित करू शकत नसल्याने विस्तार योजनांसाठी जाहीर झालेला निधी गोव्याला मिळेल की नाही यावर प्रश्नचिह्न कायम आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, देशभरातील आयआयटीमधील विद्यार्थ्यांच्या संख्येतील लक्षणीय वाढ झाल्याचे नमूद केले, विशेषत: गेल्या दशकात आयआयटी संस्थांमध्ये १०० टक्के वाढ नोंदवली गेली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

IIT Goa grant
Union Budget 2025: गोव्याला 523 कोटी रुपये अधिक मिळणार! केंद्रीय करात वाढीव वाटा; पर्यटन क्षेत्रात विशेष संधी

वर्ष २०१४ नंतर देशात सुरु झालेल्या आयआयटी संस्थांना अतिरिक्त पायाभूत सुविधा विकासासाठी मदत केली जाणार असल्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलीये. गोव्यात वर्ष २०२१६ मध्ये आयआयटीची स्थापना झाली होती मात्र जागेच्या वादामुळे गोव्याला आर्थिक अनुदानांचा फायदा होऊ शकत नाही.

गोवा आयआयटी सध्या फार्मगुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात तात्पुरत्या कॅम्पसमधून कार्यरत आहे, आणि जागेच्या वादामुळे विस्ताराच्या योजनांच्या विस्तारामध्ये अडथळा निर्माण झालाय. कायमस्वरूपी कॅम्पस नसल्यामुळे संस्थेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात खंड पडतोय. गोवा सरकारकडून जागा शोधण्याचा प्रयत्न सुरु असला तरीही वेगवेगळ्या अडथळ्यामुळे अजूनही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com