Union Budget 2025: गोव्याला 523 कोटी रुपये अधिक मिळणार! केंद्रीय करात वाढीव वाटा; पर्यटन क्षेत्रात विशेष संधी

Goa state budget allocation: राज्याला २०२५-२६ च्या अंदाजित अर्थसंकल्पानुसार ५ हजार ४९०.६२ कोटी रुपये इतका वाटा मिळणार आहे.
Goa state budget allocation
Nirmala Sitaraman Goa Budget Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa tax revenue allocation 2025 26 Unnion budget share

पणजी: राज्याला २०२५-२६ च्या अंदाजित अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकारच्या कर आणि शुल्कांच्या एकूण निव्वळ उत्पन्नातून ५ हजार ४९०.६२ कोटी रुपये इतका वाटा मिळणार आहे. हे एकूण राष्ट्रीय निव्वळ उत्पन्नाच्या 0.३८६ टक्के इतके आहे. देशाच्या एकूण निव्वळ उत्पन्नाची रक्कम १४,२२,४४४.११ कोटी रुपये (१४.२२ लाख कोटी रुपये) आहे.

महत्त्वाचे म्हणजे, मागील वर्षी गोव्याचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा ०.३८६ टक्के इतकाच होता. मात्र, त्यावेळी गोव्याला ४ हजार ९६७.३८ कोटी रुपये मिळाले होते. यावर्षी राज्याला ५२३ कोटी रुपये अधिक मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आदरातिथ्य व्यवस्थापन, होम स्टेसाठी मुद्रा कर्ज, आणि राज्यांना कामगिरीशी संलग्न प्रोत्साहनपर लाभ देण्यासारख्या उपाययोजनांची जोड या प्रयत्नांना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Goa state budget allocation
Union Budget 2025: मध्यमवर्गीयांना 'नो इन्कम टॅक्स', 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, समजून घ्या नवी कर रचना

पर्यटन क्षेत्रात रोजगार संधी

केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्र हे रोजगाराधारित विकासाचे क्षेत्र म्हणून निश्चित केले गेले आहे. रोजगाराधारित विकासाची संकल्पना राबवताना त्यात युवा वर्गासाठी तपशीलवार कौशल्य - विकास कार्यक्रम आयोजन करण्यासारख्या उपाययोजनांचा अंतर्भाव असेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com