Goa Road Condition: भाटलेतील रस्त्याची चाळण, दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष...

दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष : अपघात वाढले; दुचाकीस्वारांची तारेवरची कसरत
Goa Road Condition
Goa Road ConditionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी आणि ताळगावच्या सीमेवरील मधुबन सर्कल ते नेवगीनगरपर्यंतच्‍या भाटलेतून जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याबाबत स्‍थानिक नगरसेवकांनी महानगरपालिकेकडे तक्रार करूनही रस्‍त्‍याची डागडुजी करण्‍यात आलेली नाही.

Goa Road Condition
Goa Suicide Case: किंदळे-काणकोण येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

विशेष बाब म्हणजे पॅचर मशिनच्या साहाय्‍याने काही खड्डे बुजविले खरे, पण पाऊस पडल्याने तेथे पुन्हा मोठ्या आकाराचे खड्डे निर्माण झालेले आहेत.

दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. अनेक अपघातही घडलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या एका बाजूने जलवाहिनी टाकण्याचे काम केल्यानंतर तो चर व्यवस्थितरित्या बुजविला गेला नाही. त्यामुळे त्या ठिकाणची जागा खचली असून, त्याचे रुपांतर खड्ड्यांमध्‍ये झालेले आहे.

Goa Road Condition
Goa Comunidade: बोर्डे कोमुनिदादीत आर्थिक घोटाळा

काही ठिकाणचे खड्डे हे तर अर्धामीटर खोलीचे आहेत. या खड्ड्यांतून दुचाकी गेल्यास ती जोरदार आदळते व अपघात होतात. या मार्गावरून दररोज जो येजा करतो, त्यालाच या रस्त्याचा अंदाज येतो. बाकीचे आदळतातच.

खड्डे बुजविण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी खडी आणून टाकण्यात आलीय, पण संबंधित यंत्रणेला अजून मुहूर्त मिळालेला नाही. या धोकादायक रस्त्याविषयी साबांखाच्या अभियंत्यास कल्पना देऊनही काही पावले उचलली जात नाहीत. त्‍यामुळे अपघात वाढले आहेत.

- उदय मडकईकर, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com