Goa Comunidade: बोर्डे कोमुनिदादीत आर्थिक घोटाळा

विद्यमान मंडळाचा आरोप : न्याय देण्याची मागणी; वेळप्रसंगी मोर्चाचा इशारा
Goa Comunidade
Goa ComunidadeDainik Gomantak
Published on
Updated on

बोर्डे कोमुनिदादीत मोठा आर्थिक घोटाळा झाला असून, महत्वाचे दस्तऐवजही गायब झालेले आहेत. गत कोमुनिदाद मंडळाच्या कार्यकाळात हा प्रकार घडल्‍याचा खळबळजनक आरोप बोर्डे विद्यमान मंडळाने केला आहे.

Goa Comunidade
Zuari Flyover: फ्लायओव्हरवर कमी वेगमर्यादा पाळणे अवघड!

कोमुनिदादीत झालेल्या एकंदरीत घोटाळ्याची निपक्षपातीपणे चौकशी करुन प्रशासकांसह अन्य दोषींविरोधात गुन्हा नोंद करून कारवाई करावी, कोमुनिदादला न्याय द्यावा, अशी मागणी विद्यमान कोमुनिदाद मंडळाने केली आहे. येत्या आठ दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई झाली नाही तर म्हापसा येथील उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल, वेळप्रसंगी हे प्रकरण न्यायाधिकारिणीपर्यंत नेण्यात येईल, असा इशारा बोर्डे कोमुनिदादच्या विद्यमान मंडळाचे अध्यक्ष धनंजय पळ आणि खजिनदार गुरुप्रसाद पळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बोर्डे चव्हाट्यावर आज घेतलेल्या या पत्रकार परिषदेला कोमुनिदादचे मुखत्यार लक्ष्मीकांत पळ, पुंडलिक पळ, कृष्णा पळ, गुरुदत्त पळ, सुभाष पळ, सुनील पळ, रोहिदास पळ उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून योग्य ती कारवाई होऊन न्याय मिळेल, असा विश्वासही मंडळाने व्यक्त केला.

Goa Comunidade
Goa Suicide Case: किंदळे-काणकोण येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

लाखोंचा गैरव्यवहार

यापुर्वीच्या कोमुनिदाद मंडळाच्या कार्यकाळात दहा लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. हे दहा लाख रुपये बोर्डे येथील देवस्थानसाठी देणगी दिल्याचे दाखविण्यात आले असले तरी व्यवहार संशयास्पद आहे. त्यासाठी आमसभेत मान्यता घेण्यात आलेली नाही. दुसऱ्या बाजूने भरपाईच्या रूपाने कोमुनिदादला मिळालेले १६ लाख रुपयेही जमा करण्यात आलेले नाहीत, असा आरोप मंडळाने केला आहे.

तक्रार करूनही केली जातेय डोळेझाक

मार्च २०२२ मध्ये कोमुनिदादीवर नवीन मंडळ निवडून आले. त्यानंतर महत्वाचे दस्ताऐवज गायब असल्याचे आढळून आले. तत्कालीन कोमुनिदाद मंडळाने अद्यापही हे दस्ताऐवज नवीन मंडळाच्या ताब्यात दिलेले नाहीत. याप्रकरणी कोमुनिदादचे ‘इस्क्रीरांव’ (क्लार्क) यांच्याकडून विद्यमान मंडळाला कोणतेच सहकार्य मिळत नाही. कोमुनिदाद प्रशासकांकडूनही न्याय मिळणे सोडाच, उलट विद्यमान मंडळाला वेठीस धरण्यात येत आहे, असा आरोप धनंजय पळ यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला. या प्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली आहे. मात्र प्रशासकांकडून पोलिसांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ होत आहे, असेही मंडळाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com