IFFI 2023: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीस प्रारंभ

20 ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यात होणार महोत्सव
IFFI 2023
IFFI 2023 Dainik Gomantak
Published on
Updated on

Ineternational Film Festival of India 2023: पणजीत होणाऱ्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि फिल्म बाजारसाठी (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणीला 13 सप्टेंबर रोजी सुरवात झाली होती.

आता, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी (Media Delegates) नोंदणी सुरू झाली आहे. my.iffigoa.org/extranet/media/ या संकेतस्थळावर जाऊन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नोंदणी करता येईल.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे आयोजित केला जाणारा भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान राजधानी पणजीसह राज्यातल्या इतर काही ठिकाणी होईल.

IFFI 2023
Film City in Goa: खुशखबर! गोव्यात उभारणार फिल्मसिटी! एंटरटेन्मेंट सोसायटीतर्फे 250 एकर जागेचा शोध

दरम्यान, 13 सप्टेंबरला नोंदणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या केवळ 18 दिवसांतच 1198 प्रतिनिधींनी नोंदणी केली होती. मागील वर्षीच्या इफ्फीमध्ये एकूण 6 हजार 774 प्रतिनिधींनी नोंदणी केली होती. 2021 मध्ये इफ्फीसाठी 4068 जणांनी नोंदणी केली होती.

यंदा ती 10 हजार पर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे 2020 मध्ये इफ्फी घेण्यात आला नव्हता. 2021 मध्ये इफफी प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा हायब्रीड पद्धतीने झाला होता.

प्रतिनिधी आणि फिल्म बाझार साठीची नोंदणी इफ्फीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. प्रतिनिधी नोंदणीसाठी चित्रपट व्यावसायिक तसेच रसिकांसाठी 1,180 रुपये शुल्क असणार आहे.

IFFI 2023
Panaji Gardens: राजधानी पणजीतील 4 प्रमुख उद्यानांना मिळणार नवे रूप; 8 कोटी रूपये खर्च करणार

फिल्म बाझार विभागात सहभागी व्हायचे असल्यास विविध विभागासाठी 18 ते 21 हजार रुपये शुल्क आहे. तर विद्यार्थ्यांना हा महोत्सव मोफत आहे.

यंदा मडगाव येथील रवींद्र भवनात निवडक चित्रपट दाखवले जाऊ शकतात. महोत्सवाच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात 26 फिचर आणि 23 ते 25 नॉन फिचर चित्रपटांचा समावेश असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com