Nilesh Cabral: विजय सरदेसाईंनी क्लीन चिट देणे हे माझ्यासाठी सर्टिफिकेट; पाठिशी राहिल्याबद्दल त्यांचे आभार

आमदार नीलेश काब्राल यांचे मत; काब्राल यांच्या घरी कार्यकर्ते, समर्थकांची रीघ
MLA Nilesh Cabral
MLA Nilesh Cabral Dainik Gomantak
Published on
Updated on

Nilesh Cabral: कथित नोकरभरती घोटाळ्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या नीलेश काब्राल यांच्या घरी रविवारी रात्रीपासूनच कार्यकर्ते, समर्थकांची रीघ लागली आहे. आज सोमवारी सकाळीही त्यांच्या घरी कार्यकर्ते, समर्थक येत होते.

दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी क्लीन चीट देणे हे माझ्यासाठी सर्टिफिकेट आहे. पाठिशी राहिल्याबद्दल विजय सरदेसाई यांचे आभार, असे मत आमदार नीलेश काब्राल यांनी व्यक्त केले आहे.

MLA Nilesh Cabral
Goa Crime: गोव्यात सापडलेला 'तो' मृतदेह केरळच्या जेफ याचाच! डीएनए अहवालातून सत्य आले समोर

नीलेश काब्राल म्हणाले की, माझ्या राजीन्याम्यामुळे मतदारसंघातील लोक दुखावले आहेत. मी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे, आमदारकीचा नाही. माझ्यासारखे पाच आमदार होते, पण पर्रीकरांनी मला मंत्रीपदाची संधी दिली.

मी डेडीकेशनने काम करतो. नेहमी लोकांचा विचार केंद्रस्थानी असतो. दबाव टाकला असता तर राजीनामा दिला नसता, विनंती केली म्हणून राजीनामा दिला, असा पुनरूच्चारही त्यांनी केला.

ते म्हणाले, विरोधी पक्षातील विजय सरदेसाई यांसारख्या नेते पाठिंबा देतात तेव्हा माझ्यासाठी ते सर्टिफिकेट असते. विजय सरदेसाईंनी माल क्लीन चिट दिली आहे. खरेतर विरोधक सत्ताधाऱ्यांना खाली खेचू पाहत असतात.

पण सरदेसाईंनी मला पाठिंबा दिला आहे. त्यातून माझे नेतृत्व विविध पक्षांकडून स्विकारले गेले आहे, हेच दिसून येते. मी त्यांचे आभार मानतो.

MLA Nilesh Cabral
Goa Tourist Drown: बुडणाऱ्या मैत्रिणीला वाचवायला गेला अन् बुडाला; मुंबईच्या पर्यटक तरूणाचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू

काब्राल म्हणाले, अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर आता भर असणार आहे. माझ्या मतदारसंघावर आता जास्त लक्ष द्यायला मिळेल. रोज फॉलोअप घेऊन अनेक कामे मार्गी लावता येतील. मंत्री असताना इतका वेळ मिळत नाही.

आता माझ्या मतदारसंघातील कामांसाठी पुरेसा वेळ देता येईल. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने विविध प्रलंबित कामे मार्गी लावू. संजय स्कूलची इमारत पूर्ण करू.

काब्राल यांना भेटण्यासाठी सकाळपासून लोक येत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमदार असल्याने लोक भेटायला येतात. कालपासूनच लोकांची भेटण्यासाठी रीघ लागली आहे. आज सकाळपासूनही लोक येत आहेत. लोकांमध्ये जाऊन काम करतो.

त्यामुळे लोक भेटायला येत आहेत. लोकांना नीलेश काब्रालवर विश्वास आहे. कोणताही प्रश्न असेल तर नीलेश काब्राल मार्गी लावेल हा विश्वास लोकांना आहे. लोकांसाठी काम केले आहे, त्यामुळे लोकांमध्ये माझ्याबाबत चांगल्या भावना आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com