Goa Covid-19: नवीन वर्षाच्या धमाल आणि पार्ट्यांनंतर आता गोव्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच काही दिवसांमागे मुंबईहून सुमारे 2000 पर्यटकांना घेऊन आलेल्या कोर्डेलिया क्रुझ (Cordelia Cruise) मधील काही प्रवाशी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने जहाजाला मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला होता. जहाजातील सर्वांना सक्तीने कोविड चाचणी (Corona Test) करायला लावली होती.जो पर्यंत सर्व प्रवाशांची चाचणी होत नाही तोपर्यंत क्रुझ जहाजाला एमपीटी बंदरात क्रुझ टर्मिनलवर प्रवेश नाकारण्यात आला होता. आता त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला आहे.
जहाजातील 2000 प्रवाशांपैकी 66 प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. संबंधित कलेक्टर आणि एमपीटी कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे. आता जहाजातून प्रवाशांना खाली उतरवण्याची परवानगी द्यायची की नाही, याचा सर्वस्वी निर्णय संबंधित अधिकारी घेतील, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी ट्विटद्वारे कळवले आहे. यावर ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.