
मडगाव: घरात शिरून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला अभिषेक हिरेमठ (२७) याला न्यायालयाने मंगळवारी तीन वर्षांची सक्त मजुरीचा शिक्षा व १५ हजारांचा दंड ठोठावला. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. सरकार पक्षातर्फे ॲड. व्ही. जे. कॉस्ता यांनी युक्तिवाद केला.
आरोपीने (Accused) या खटल्यात यापूर्वीच तुरुंगात तीन वर्षे काढली असल्याने तो काळ शिक्षा म्हणून गृहीत धरण्यात आला आहे. केपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत अभिषेकने वरील गुन्हा केला होता. त्याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३०७, ४५७, ४५९ कलमांनुसार गुन्हा नोंद केला होता. ८ डिसेंबर २०२१ साली वरील घटना घडली होती.
लक्ष्मीकांत शिकेरकर हे तक्रारदार आहेत. आरोपी त्यांच्या घराची कौले काढून आत शिरला होता. सोबत त्याने ५ लिटर पेट्रोल, २ लायटर, चाकू व दांडाही नेला होता. बेडरूममध्ये जाऊन त्याने तक्रारदाराची पत्नी मंदाकिनी शिकेरकर हिच्या पर्समधील ६ हजार ९९० रुपये चोरले होते. मागाहून हॉलमध्ये जाऊन त्याने तक्रारदारावर पेट्रोल ओतले होते. पण त्याला पेटवून देण्याचा त्याचा प्रयत्न फसला होता. घरातील लोकांनी त्याला पकडले. अभिषेक हिचे मंदाकिनीशी भांडण झाले होते. त्याच्या सूड उगविण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.