एसीजीएल कामगार पगारवाढ प्रश्न मिटण्याची शक्यता

कामगार आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे कामगार पगारवाढ प्रश्न मिटण्याची शक्यता
ACGL Worker
ACGL Workerdainikgomantak
Published on
Updated on

पिसुर्ले (पणजी): गेल्या काही दिवसांपासून वारंवार चर्चेत येणाऱ्या एसीजील कामगारांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावर कामगार आयुक्त बरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद लाभला असल्याने हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आज (दि 27) संपन्न झालेल्या कामगार संघटनेच्या वार्षिक सभेत झालेल्या चर्चेतून असे दिसत आहे. सदर कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनांनी काही दिवसांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाला प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाही तर 2 मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे कामगार संघटनेने संपाची सर्व तयारी केली होती. मात्र याची दखल घेऊन राज्य सरकारच्या कामगार आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांची तातडीची संयुक्त बैठक आयोजित करून या प्रकरणी सुवर्णमध्य तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत असलेला हा विषय सुटण्याची शक्यता दिसत आहे. (ACGL workers are likely to get rid of the issue of salary increase)

या संबंधी सविस्तर वृत्त असे की, सदर कंपनीच्या (ACGL) कामगाराच्या (workers) पगारवाढीचा (Salary increase) विषय 1 एप्रिल 2018 पासून प्रलंबित आहे. त्यावर आतापर्यंत कामगार संघटना (worker union) आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या मध्ये बऱ्याच बैठका झाल्या. परंतु सदर कंपनीने कामगार संघटनांनी दिलेल्या पगारवाढ प्रस्ताव मान्य केल्या नसल्याने या कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनांनी गेल्या वर्षीच्या आक्टोबर महीन्यात पाच दिवस संप पुकारला होता. त्याही वेळी कंपनीच्या वतीने कोणताच तोडगा काढला नव्हता. त्याचप्रमाणे त्या नंतर सुद्धा कामगार संघटनांनी कंपनीच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवून कंपनीचे कामकाज सुरू ठेवले होते. परंतू त्यानंतर सुद्धा कंपनी व्यवस्थापन कोणतीच भूमिका घेत नसल्याने काही दिवसांपूर्वी कामगार संघटनांनी कंपनीला दि .2 मार्च पासून बेमुदत संप करण्याचा इशारा देऊन नोटीस दिली होती. त्यामुळे संप होणार हे अटळ बनले होते.

ACGL Worker
24 तासांची मुदत, ‘लिंक रोड’च्या बांधकामाविरोधात रास्ता रोको

कामगार संघटनांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्याची दखल राज्य कामगार आयुक्तांनी (State Labor Commissioner) घेतली. त्यानंतर शुक्रवार (दि 25 रोजी) आपल्या कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित करून कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीन वर्षांसाठी पाच हजार पगारवाढ, तसेच इतर काही मागण्या मान्य झाल्याचा प्रस्ताव असल्याचे कामगार आयुक्ता बरोबर झालेल्या बैठकीत चर्चेतून समोर येत आहे. याची माहिती आज झालेल्या कामगार संघटनेच्या वार्षिक सभेत देण्यात आली. त्यावर कामगार संघटना आणि कामगार यांच्या मध्ये साधक बाधक चर्चा होऊन हा मुद्दा आणखीन ताणून न धरता कंपनीने तीन वर्षांसाठी पाच हजार रुपये पगारवाढ तसेच इतर सुविधा देण्याचे मान्य केल्यास हा विषय संपुष्टात आणावा असा सुर या बैठकीत दिसून आला आहे. त्यामुळे उद्या (दि 28 रोजी) कामगार आयुक्त बरोबर होणाऱ्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष वेधून राहीलेले आहे.

ACGL Worker
मतदारांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला; गिरीश चोडणकर

होंडा येथिल सुंदरम सभागृहात संपन्न झालेल्या सदर वार्षिक सभेस संघटनेचे कायदेशीर सल्लागार सुभाष जार्ज नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, एसीजीएल बिबीडी तसेच एस. एम. डी. या दोन्ही कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर तसेच कायदेशीर सल्लागार सुभाष जार्ज नाईक यांनी कामगारांना सविस्तर माहिती देऊन संपाच्या बाबतीत सबुरीचा सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com