गोवा विधानसभा सभापती पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन: रमेश तवडकर

माझा माझ्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Ramesh Tawadkar News, Goa Vidhan Sabha News,
Ramesh Tawadkar News, Goa Vidhan Sabha News, Dainik Gomantak

काणकोण: राज्य विधानसभा सभागृहाचे सर्वोच्च पद राष्ट्रीय नेतृत्वाने माझ्यावरील विश्वास तसेच कार्यक्षमता ओळखूनच दिले आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे. माझा माझ्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (I will fulfill responsibility given by national leadership of BJP says tawadkar)

Ramesh Tawadkar News, Goa Vidhan Sabha News,
गोव्यातील कामगार विरोधी कायदे मागे घ्या; आयटेक सरचिटणीस फोन्सेका यांची मागणी

माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना पक्षाने मोठे केले आहे. सभापती पदाची घोषणा झाली त्यानंतर दोन दिवस मंत्रीपद मिळायला हवे होते, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर सकारात्मक विचार करून पक्षाने मोठे संविधात्मक पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मत्रीपदापेक्षा हे पद मोठे आहे. मूळातच माझा पिंड पिडीत समाजाचे दूख हलके करण्याचा आहे, त्यामुळेच कदाचित नियतीने साथ देऊन एका शिक्षकाला चार वेळा आमदार बनविले आणि आता सर्वोच्च पद दिले आहे. (Ramesh Tawadkar News)

Ramesh Tawadkar News, Goa Vidhan Sabha News,
रोहित मोन्सेरात पुन्हा पणजीच्या महापौरपदी बसण्यासाठी सज्ज

सभापती पद मिळाल्यानंतर काणकोणचा (Canacona) विकास थांबणार नाही, उलट त्याला गती मिळणार आहे. विधानसभा काळात सभापतीचे विशेष काम असते. अन्य काळात आठवड्यातून एक दोन वेळाच पणजीला कार्यालयीन कामानिमित्त जावे लागणार आहे. काणकोणमधील रविंद्र भवनाचे काम गेली दोन वर्षे करोना महामारीमुळे आर्थीक मंदी आल्यामुळे रखडले होते. मात्र आता त्याला गती देऊन एका वर्षात रविंद्र भवन पूर्ण करण्यात येणार आहे. कृषी भवनाच्या कामालाही चालना देण्यात येणार आहे. गावडोंगरी,खोतीगाव व पैगीण पंचायतीच्या काही वाड्याना गावणे धरण वरदान ठरणार आहे. 21 कोटी रूपयांचा हा प्रकल्प फक्त धरण उभारून बंद ठेवण्यात आला आहे. या धरणाचे पाणी पेय जल व जलसिंचनासाठी खोतीगावातील कुस्के पर्यत नेण्याची योजना. जलवाहीनी टाकून जलकुंभ उभारणे ही कामे बाकी आहेत त्या साठी काही जमिनदाराचे प्रश्न आहेत त्यासाठी सरकारी मालकीच्या जमिनीचा वापर त्यासाठी करून ही समस्या मिटविण्यात येणार असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com