Alex Reginald Lawrence: माझ्या वाईट काळातही कुडतरीचे लोक माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिले आहेत. आता त्यांची कामे करणे हे माझे एकमात्र ध्येय आहे. गरज पडल्यास त्यासाठी मी भाजप बरोबरही जाऊ शकतो, अशी भूमिका कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Alex Reginald Lawrence) यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यात भाजपा (BJP) पूर्ण क्षमतेने सत्तेवर येण्याची शक्यता अंधुक होत असताना उद्या कदाचित गरज पडली तर जिंकून आलेले दुसऱ्या पक्षातील आमदार भाजपला पाठिंबा देणार का? हा प्रश्न चर्चेत असताना रेजिनाल्ड यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले रेजिनाल्ड कुडतरीत जिंकून येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावर ते म्हणाले, पूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) असताना माझी कामे करून घेण्यासाठी भाजपकडे जात होतो. त्यावेळी माझ्यावर प्रचंड टीका व्हायची. मात्र आता जिंकून आल्यास मी अपक्ष असेन त्यामुळे माझ्यावर कसलेही बंधन नसेल.
मात्र कुडतरकरांवर ही पाळी येणारच नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार मोरेन रिबेलो यांनी व्यक्त केली. कुडतरीत काँग्रेसच जिंकून येणार आहे. त्यामुळे कुडतरीच्या आमदाराने भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.