Goa Politician Scandal: मंत्र्याची बदनामी; 10 दिवसांनंतरही तपास शून्य

Goa Political Scandal: पोलिसांची आता ‘फेसबूक’, ‘व्हॉट्स ॲप’कडे माहितीसाठी धाव
Goa Political Scandal
Goa Political Scandal Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politician Scandal Case Investigation Update: समाजमाध्यमांवर खोटी माहिती प्रसारित करून आपली बदनामी केली, अशी तक्रार पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि चिखलीच्या उपसरपंच ऐश्र्वर्या कोरगावकर यांनी वास्को पोलिसांत करून 10 दिवस उलटले तरी पोलिस संशयितांपर्यंत अजून पोहोचलेलेच नाहीत.

अशी स्थिती असताना मंत्री गुदिन्हो यांनी कुणीतरी आपला हुबेहूब आवाज काढून नवा ऑडिओ प्रसारित केल्याचा आरोप केल्याने हे बदनामी प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.

त्या पोस्ट कुणी केल्या, याची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आता ‘फेसबूक’ आणि ‘व्हॉट्स ॲप’ यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांच्या अहवालाची आम्ही वाट पाहात आहोत, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.

Goa Political Scandal
Teachers Day 2023: शिक्षण व्यवस्थेवर आता प्रशासनाची बारीक नजर; विद्या समीक्षा केंद्राची लवकरच स्थापना

ऑडिओची तक्रारच नाही

मंत्री माविन गुदिन्हो यांनी आपला हुबेहूब आवाज काढून जो नवा ऑडिओ प्रसारित केला, त्यासंदर्भात जी तक्रार केली आहे, त्याबद्दल विचारले असता यासंदर्भात पोलिसांना कुणी काही माहिती दिलेली नाही किंवा आमच्याकडे तशी तक्रारही आलेली नाही, असे नायक यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची मोघम प्रतिक्रिया

कथित सेक्स स्कँडलसंदर्भात डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी विचारले असता, या सगळ्या प्रकरणांवर कार्यालयीन चौकशी सुरू आहे आणि वेळच्यावेळी सरकारकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगितले जाईल, असे साचेबद्ध उत्तर त्यांनी दिले.

Goa Political Scandal
Drunk and Drive:14 लाख वाहने, अल्कोमीटर केवळ 84; मद्यपी वाहनचालकांना पकडणार कसे?

नेटकऱ्यांची जबाब नोंदणी सुरू

व्हॉट्स ॲपवर ज्या कुणी यासंदर्भात कमेंट केली आणि पोस्ट फॉरवर्ड केल्या, त्यांची यादी तयार करून पोलिसांनी त्यांना जबानी देण्यासाठी बोलावून घेणे सुरू केले आहे.

व्हॉट्स ॲपवर सक्रिय असणारे पणजीचे महेंद्र धारवाडकर यांना बोलावून घेऊन त्यांची जबानी नोंदवून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. आम्ही आणखी काहीजणांना चौकशीसाठी बोलावून घेऊ, अशी माहिती निरीक्षक नायक यांनी दिली.

"हे प्रकरण तांत्रिक बाबींवर आधारित असल्याने जोपर्यंत ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्स ॲप’कडून पहिल्यांदा पोस्ट पाठवणारा कोण, हे समजल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. कित्येकदा अशी माहिती प्राप्त होण्यासाठी काही महिनेसुद्धा वाट पाहावी लागते. या प्रकरणाचा तपास त्यामुळेच रेंगाळल्यासारखा वाटत आहे."

- कपिल नायक, तपास अधिकारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com