Goa Vaccination: शंभर टक्के लसीकरणाचा दावा कितपत खरा

शंभर टक्के लसीकरणाच्या दाव्याला विरोधकांनी आक्षेप घेतला
Goa 100 percent vaccination
Goa 100 percent vaccinationDainik Gomantak

पणजी: शंभर टक्के लसीकरणाबद्दल (100 percent vaccination) केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय रस्ते विकास, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गोवा सरकारचे (Goa Government) अभिनंदन केले असले तरी राज्य सरकारचा लसीकरणाचा हा दावा कितपत खरा आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभर टक्के लसीकरणाच्या दाव्याला विरोधकांनी आक्षेप घेतला असून सरकार खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारच्या मते जे वैद्यकीयदृष्ट्या फिट आहेत आणि ज्यांना लस घ्यायची इच्छा आहे अशा 100 टक्के लोकांचे लसीकरण झाल्याचे मानण्यात येते मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्यापही लस घेतलेली नाही. राज्यात आतापर्यंत 16 लाख 61 हजार 679 लोकांचे लसीकरण झाले असून त्यापैकी 11 लाख 83 हजार 247 नागरिकानी पहिला डोस, तर 4 लाख 78 हजार 432 लोकांंनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या अंदाजे 12 लाखांहून अधिक असावी असे मानले जाते. अनेक वृद्ध, गर्भवती, लसीकरणासाठी वैद्यकीय अपात्र आणि ज्यांना लस घ्यावयाचीच नाही असे अनेक लोक राज्यात आहेत. त्यामुळे 100 टक्के लसीकरणाचा दावा कितपत योग्य, हा प्रश्न कायम आहे.

Goa 100 percent vaccination
लसीकरणात गोवा अव्वल: 100 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस; मुख्यमंत्र्यांचा दावा

दोन बळी; 840 सक्रिय

राज्यात आतापर्यंत 1 लाख 74 हजार 770 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 लाख 70 हजार 716 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर 3 हजार 214 जनांचा कोरोनाने बळी गेले आहे. शुक्रवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला.

Goa 100 percent vaccination
Goa Election: गोवा बीचवर ‘आव गोयंचो सायबा’

"राज्य सरकारने यापूर्वी 100 टक्क्याचे अनेक खोटे दावे केले आहेत त्याप्रमाणे लसीकरणाचा हा दावाही खोटा आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना अजून लस मिळालेली नाही."

- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com