Goa Congress: कर्नाटकच्या मतदारांना गोव्यात सरकारी नोकऱ्या कशा मिळाल्या? आमदार कार्लुस फेरेरा यांचा सवाल

मागच्या दाराने नोकऱ्या दिल्या का? याची चौकशी करण्याची मागणी
Congress MLA Carlos Alvares Ferreira on Paid leave to Karnataka voters
Congress MLA Carlos Alvares Ferreira on Paid leave to Karnataka votersDainik Gomantak

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी पात्र असलेल्यांना पगारी सुट्टी देण्याच्या मुद्द्यावर मंगळवारी काँग्रेसने टीका केली. कर्नाटकात मतदान करणाऱ्यांना गोव्यात सरकारी नोकऱ्या कशा दिल्या जातात?, असा सवाल काँग्रेसचे आमदार कार्लुस अल्वारेस फेरेरा यांनी मंगळवारी गोवा सरकारला केला.

(Congress MLA Carlos Alvares Ferreira on Paid leave to Karnataka voters)

Congress MLA Carlos Alvares Ferreira on Paid leave to Karnataka voters
Karnataka Election 2023: कर्नाटकच्या मतदारांना पगारी रजेबाबत मुख्यमंत्री सावंत यांचे मोठे वक्तव्य; काय म्हणाले वाचा...

पत्रकार परिषदेत आमदार फेरेरा म्हणाले की, सरकारी विभागातील रोजंदारी कामगार आणि इतरांना सुट्टी दिली आहे. याचा अर्थ ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या आहेत आणि IDC वगैरे सारख्या औद्योगिक विभागातील कर्मचाऱ्यांनाही सुट्टी आहे. यावरून काय कळते?

या सरकारने बाहेरच्या लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या. त्यांचे मतदान दुसर्‍या राज्यात असेल तर त्यांना इथे नोकऱ्या कशा मिळाल्या?

“गोवावासियांना सरकारी किंवा अगदी अगदी कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी करावी लागेल, जॉब कार्ड मिळवावे लागेल. एम्प्लॉयमेंट कार्ड वैध नसल्यास नोकरी मिळत नाही. मग या लोकांना नोकऱ्या कशा मिळाल्या?

याचा अर्थ या लोकांना मागच्या दाराने नोकऱ्या मिळाल्या आहेत. याचा अर्थ सरकारने नोकऱ्या विकल्या आहेत का?

Congress MLA Carlos Alvares Ferreira on Paid leave to Karnataka voters
Mauvin Godinho: माझ्याकडे अल्लादीनचा दिवा नाही! 'मोपा'वरील टॅक्सी काऊंटरबाबत काय म्हणाले पर्यटन मंत्री, वाचा...

काँग्रेस पक्ष हा मुद्दा उचलून धरणार आहे आणि ज्यांच्याकडे येथे कायमस्वरूपी वास्तव्य नाही, अशा लोकांना या नोकर्‍या देण्यास कारणीभूत असलेल्या चुकीच्या अधिकार्‍यांवर खटले दाखल केले जातील.

गोव्यात यूपी, बिहारचे अनेक कामगार आहेत. काहीवेळा ते मतदानासाठी परत जातात. पण गोव्याने त्यांना मतदानासाठी कधी सुट्टी दिली नाही. त्यामुळे यावेळी सुट्टी का दिली, याचे स्पष्टीकरण सरकारला द्यावे लागेल.

गोवावासीयांची फसवणूक झाली आहे. या लोकांकडे डुप्लिकेट मतदान कार्ड आहेत का आणि दोन्हीकडे मतदान करू शकतात का, त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असेही आमदार फेरेरा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com