Mauvin Godinho: मोपा विमानतळावरील टॅक्सी काऊंटरचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांना याबाबत विचारले असता त्यांनी माझ्याकडे अल्लादीनचा जादुई दिवा नाही. हा प्रश्न सुटायला किमान दोन आठवडे लागतील, असे उत्तर दिले.
मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या पणजी येथील निवासस्थानी ब्लू कॅब आणि मोपा विमानतळावरील टॅक्सी काउंटरबाबत बैठक झाली. या बैठकीत मोपा विमानतळ प्रभारी, परिवहन संचालक व इतर संबंधित मान्यवर उपस्थित होते.
गुदिन्हो म्हणाले की, लवकरात लवकर टॅक्सी चालकांना काऊंटर दिले जाईल. त्याच्या प्रक्रियेला विलंब लागत आहे. त्यासाठी राज्याच्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करून मोपा विमानतळावर ब्लु टॅक्सींना सामावून घेतले जाईल.
पेडण्यातील लोकांसाठी प्रीपेड टॅक्सी काऊंटर असेल. त्यांना लवकरच टॅक्सीचे परवानेही दिले जातील.
मोपा विमानतळ सुरू झाल्यावर दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद होईल, अशी चर्चा काहीजण मुद्दाम करत होते. परंतु प्रत्यक्षात दोन्ही विमानतळांवर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. दाबोळी विमानतळावरदेखील फ्लाईट स्लॉट वाढले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.