Karnataka Election 2023: कर्नाटकच्या मतदारांना पगारी रजेबाबत मुख्यमंत्री सावंत यांचे मोठे वक्तव्य; काय म्हणाले वाचा...

उद्योगांनी समजून घेतले पाहिजे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील जे मतदार गोव्यात कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गोवा सरकारने कर्नाटकच्या विधानसभा निवडणूक मतदानादिवशी पगारी रजा जाहीर केली आहे. त्यावरून राज्यात विरोधी पक्षांनी तसेच उद्योगांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(CM Pramod Sawant On Paid leave to Karnataka Voters in Goa)

CM Pramod Sawant
पणजीतील 'त्या' युवकाची मृत्युशी झुंज अपयशी; 3 महिन्यांपुर्वी झाली होती बेदम मारहाण

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ही पगारी सुट्टी कर्नाटकातील जे मतदार गोव्यात काम करतात त्यांच्यासाठी आहे. उद्योगांनी हे समजून घेतले पाहिजे. गोव्यात जेव्हा मतदान होते तेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनीदेखील गोव्याच्या मतदारांना जे त्यांच्या राज्यात कार्यरत होते, त्यांना अशी पगारी रजा दिली होती.

मतदारांचा हा अधिकार आहे आणि तो राज्यघटनेने दिलेला आहे. हे उद्योगांना कळले पाहिजे. उद्योजकांनी याबाबत विचार केला पाहिजे.

ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाचे याबाबत दिशानिर्देश आहेत. कर्नाटकातील जे मतदार खासगी क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी ही सुट्टी आहे. माविन गुदिन्हो यांनी यापुर्वीच हे स्पष्ट केले आहे. कर्नाटक निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार हे केले गेले आहे.

CM Pramod Sawant
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील सिंगल लेनचे काम गणपतीपुर्वी पूर्ण करा; नितीन गडकरींचे आदेश

आपण एकाच देशात राहतो. आपणही आपल्या निवडणुकीवेळीही शेजारील राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये असे केले जाते.

दरम्यान, बेळगावमधील 18 पैकी 15 जागा भाजप जिंकेल तसेच कर्नाटकात भाजपचे सरकार पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com