Asgaon Goa: घर पाडून पिता-पुत्राचे अपहरण; भूमाफियांनी गोव्याचा 1-1 इंच बळकावणे फार दूर नाही, युरींचा इशारा

Asgaon Goa: आतातरी मुख्यमंत्री कारवाई करतील का? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
Asgaon Goa
Asgaon GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Asgaon Goa

भायरो आल्तो-आसगाव येथे जेसीबीचा वापर करून घर पाडण्यासह घरमालक प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांकडून महिलेसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आक्रमक झाले असून, त्यांनी गोवा पोलिसांनी या कारवाईसाठी परवानगी दिली. तसेच, रिअल इस्टेट माफियांना भाजपचा आश्रय असल्याचा आरोप केलाय.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बंगला बुलडोझर घालून जमिनदोस्त करेल अशी गोमंतकीयांची अपेक्षा होती, दुर्दैवाने, भाजपचा आश्रय असलेल्या रिअल इस्टेट माफियांना गोवा पोलिसांनी घरातील दोन रहिवाशांचे अपहरण करून गोव्यातील निवासी घर जमिनदोस्त करण्याची परवानगी दिली आहे. आतातरी मुख्यमंत्री कारवाई करतील का? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

आपल्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकणाऱ्या गोमंतकीयांसाठी ही धोक्याची घंटा आहे. या घटनांमधून धडा न घेतल्यास गोव्याबाहेरील रिअल इस्टेट आणि भूमाफियांनी गोव्याचा एक-एक इंच बळकावणे फार दूर नाही, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

Asgaon Goa
Benaulim ZP By-Election Result: बाणावलीत इंडिया आघाडी सरस, 'आप'च्या जोसेफ पिमेंता यांचा विजय

भाजप सरकारने गेल्या बारा वर्षात गोव्यात जमीन आणि रिअल इस्टेट माफियांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना संरक्षण दिले हे स्पष्ट आहे. गोव्याच्या विक्रीतून आपली तिजोरी भरण्यावर भाजप नेतृत्वाचा भर आहे. भाजपला त्यांचा अजेंडा चालू ठेवू दिल्यास गोव्याची संपूर्ण ओळख नष्ट होईल, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

आसगाव येथील रहिवासी घराची मोडतोड रोखण्यासाठी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करण्याऐवजी विलंब करण्याचे धोरण अवलंबल्याचे जाणून मला धक्का बसला. सदर घर पाडण्याचे काम सुलभ करण्यासाठी घरातील दोन पुरुष सदस्यांचे अपहरण करण्यात आले हे गंभीर आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

या अमानुष कृत्याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची माझी मागणी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com