Benaulim ZP By-Election Result: बाणावलीत इंडिया आघाडी सरस, 'आप'च्या जोसेफ पिमेंता यांचा विजय

Benaulim ZP By- Election Result: जोसेफ पिमेंतो यांनी 3,049 मताधिक्याने विजय मिळवला आहे.
Joseph Jesus Gabriel Pimenta
Joseph Jesus Gabriel PimentaDainik Gomantak
Published on
Updated on

Benaulim ZP By-Election Result

बाणावली पंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार जोसेफ पिमेंता 3,049 मताधिक्याने विजयी झाले आहेत. पिमेंता यांना एकूण 5,612 मते मिळाली.

लोकसभेनंतर बाणावलीच्या पोटनिवडणुकीने दक्षिणेत राजकीय वातावरण गरम झाले होते मात्र, निकालाने दक्षिणेत इंडिया आघाडीच सरस असल्याचे समोर आले आहे.

कोणाला किती मते

जोसेफ पिमेंता - 5,612 मते

रॉयला फर्नांडिस - 1,840 मते

ग्रेफीन्स फर्नांडिस - 2,623 मते

तर फ्रॅक फर्नांडिस - 276

या निवडणुकीत एकूण 10,492 मतांपैकी 81 मते अवैध ठरली तर 10,411 मते वैध ठरली.

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत 20,129 मतदारांची यादी निश्र्चित करण्यात आली. रविवारी 27 मतदान केंद्रांद्वारे केवळ 10,492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Joseph Jesus Gabriel Pimenta
Panaji News : भाई मोये निःस्वार्थी, धडपड्या कार्यकर्ता : रवींद्र आमोणकर

बाणावली पंचायतीच्या पोटनिवडणुकीत ‘इंडिया’तर्फे ‘आप’चे जोसेफ पिमेंता, ग्रेयफन्स फर्नांडिस, श्रीमती रॉयला फर्नांडिस व फ्रॅंक फर्नांडिस हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

पण, खरी लढत जोसेफ पिमेंता, श्रीमती रॉयला फर्नांडिस व ग्रेयफन्स फर्नांडिस यांच्यात असल्याचे बोलले जात होते. निकालाअंती इंडिया आघाडीचे उमेदवार जोसेफ पिमेंता सरस असल्याचे समोर आले असून, ते 3,049 मतांनी विजयी झाले आहेत.

बाणावलीचे आप आमदार वेंझी व्हिएगस यांनी जिल्हा पंचायतीसाठी मतदार इंडिया आघाडीच्या उमेदवारांसोबत उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com