Goa Congress: पूजा शर्माला अटक करा! गोवा काँग्रेसचा CM सावंत यांना 24 तासांचा अल्टिमेट्म

Asgaon Goa House Demolition: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि लवकरच कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
LOP Yuri Alemao Amit Patkar Alton D'costa
LOP Yuri Alemao Amit Patkar Alton D'costaDainik Gomamntak
Published on
Updated on

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या कुटुंबियांना बेघर करुन घर पाडण्यासह पितापुत्रांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना 22 जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मुख्य संशयित पूजा शर्माला 24 तासांत अटक करण्याची मागणी गोवा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, रमाकांत खलप, आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी आज (दि.25 जून) आगरवाडेकर कुटुंबियांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला अटक करण्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना 24 तासांचा अल्टिमेट्म दिला आहे. कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

तर, विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी याप्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन चौकशीची मागणी केली. अमित पाटकरांनी याप्रकरणात पोलिस महासंचालकांच्या भूमिकेची देखील चौकशी करण्याची मागणी केलीय.

LOP Yuri Alemao Amit Patkar Alton D'costa
Goa IDC Exit Support Scheme: गोव्यातील नव्या उद्योजकांना संधी, IDC तील 423 भूखंड खुले होणार

काय आहे प्रकरण?

बिगर गोमंतकीय पूजा शर्मा या महिलेने फॉर्म 1 व 14 वर नावाची नोंदणी असल्याचे सांगून प्रदीप आगरवाडेकर राहत असलेल्या घराच्या मालकीचा दावा केला. मूळ मालकाकडून जमीन खरेदी केल्याचे सांगत, आगरवाडेकर भाडेकरू असल्याचा आरोप केला.

पूजा शर्माने बाऊंन्सर्सद्वारे आगरवाडेकर राहत असलेले घर पाडले, यात व्यत्यय येऊ नये म्हणून तिने आगरवाडेकर पितापुत्राचे अपहरण देखील केल्याचा आरोप तिच्यावर आहे. रात्री उशीरा सुमारास दोघांना सोडण्यात आले.

पोलिसांनी कारावाईत मध्यस्थी केली खरी पण तोपर्यंत घराचे खूप नुकसान झाले होते. दरम्यान, याप्रकरणात आत्तापर्यंत जेसीबी चालक आणि रिअल इस्टेट एजंटला अटक करण्यात आली आहे. तसेच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शंभर टक्के कारवाईची हमी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com