Goa IDC Exit Support Scheme: गोव्यातील नव्या उद्योजकांना संधी, IDC तील 423 भूखंड खुले होणार

Goa Launch IDC Exit Support Scheme: भूखंड हस्तांतर करताना द्यावी लागणारी ट्रान्सफर फी माफ केली जाणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
Goa CM Dr. Sawant And Other Minister At launching Of IDC Exit Support Scheme
Goa CM Dr. Sawant And Other Minister At launching Of IDC Exit Support SchemeDainik Gomantak

गोव्यातील नव्या उद्योजकांना संधी देण्यासाठी गोवा सरकारतर्फे 'एक्झिट सपोर्ट योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील औद्योगिक वसाहतीत 1980 सालापासून विनावापर असलेले 423 भूखंड नव्या उद्योगांसाठी खुले करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील युवकांसाठी रोजगार संधी मिळणार आहे तसेच, उद्योजकांसाठी गुंतवणूक पर्याय मिळणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात औद्योगिक वसाहतीत भूखंड प्रकरणी एक्झिट पॉलिसी अस्तित्वात नव्हती.

त्यामुळे 1980 सालापासून 423 भूखंड विनावापर असल्याचे समोर आले आहे. हे भूखंड नव्याने देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली असून, यामुळे युवकांना रोजगार मिळणार आहे तसेच, राज्यात नव्याने गुंतवणूक येण्यासाठी मदत होणार आहे.

भूखंडाची माहिती आजच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Goa CM Dr. Sawant And Other Minister At launching Of IDC Exit Support Scheme
Goa Crime: गोव्यात फसवणुकीचा नवा फंडा! बँक खाती 'Rent' वर घेऊन तरुणांना गंडा, अवघ्या 1 हजारांचं कमिशन भोवलं

सरकारच्या एक्झिट पॉलिसीचा फायदा घेण्यासाठी युवकांनी व उद्योजकांनी पुढे यावे. नव्यांना संधी देण्यासाठी भूखंड धारकांनी हस्तांतरासाठी सहकार्य करावे. तरूणांनी याचा अधिक फायदा घ्यावा, असे आवाहन सावंत यांनी केले.

भूखंड हस्तांतर करताना द्यावी लागणारी ट्रान्सफर फी माफ केली जाणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

तसेच, औद्योगिक वसाहतींमधील वीज समस्या सोडविण्यासाठी अंतर्गत विजवाहिण्या घालणार असल्याचे सांवत म्हणाले. पुढील दिड वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com