Sattari Goa News: या ठिकाणी नवीन उद्योगधंदे सुरु झाल्यास अनेकांना रोजगाराची संधी मिळू शकते असे मत काही उद्योजकांनी व्यक्त केले
Honda sattari IDCDainik Gomantak

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Sattari Goa News: या ठिकाणी नवीन उद्योगधंदे सुरु झाल्यास अनेकांना रोजगाराची संधी मिळू शकते असे मत काही उद्योजकांनी व्यक्त केले
Published on

वाळपई: स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून काही वर्षांपूर्वी सत्तरी तालुक्यातील होंडा इथे एक औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली होती, मात्र या ठिकाणी योग्य रस्ते नसल्याचे कारण देत काही वर्षांतच हे प्रकल्प बंद झाले. सध्या या भागातील इमारती कोणत्याही क्षणी कोसळून पडतील अशा स्थितीत उभ्या आहेत तर दुसऱ्या बाजूला रस्त्याचं देखील चित्र बऱ्यापैकी खराब झालेलं पाहायला मिळतंय. होंडा औद्योगिक वसाहतीची एवढी दुर्व्यवस्था होऊन देखील सरकारचे अद्याप याकडे लक्ष गेलेलं नाही.

एखादी वसाहत खुलणार असेल तर तिथे किंमत वीज आणि पाण्याचा मुबलक पूरवठा असावा लागतो, मात्र होंडा येथील वसाहतीला या किमान गोष्टींचाही नीट पुरवठा होत नसल्याने इथे काम करणं कामगारांसाठी मुश्किल झालं आहे.

Sattari Goa News: या ठिकाणी नवीन उद्योगधंदे सुरु झाल्यास अनेकांना रोजगाराची संधी मिळू शकते असे मत काही उद्योजकांनी व्यक्त केले
Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

अनेकवेळा उद्योगांच्या मालकांनी उद्योग खात्याचे अधिकारी तसेच मंत्र्यांकडे धाव घेत याबद्दल तक्रार नोंदवली होती तरीही पदाधिकाऱ्यांकडून याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातंय असं वसाहतीतील अधिकाऱ्यांचं मत आहे.

स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून या वसाहतीची निर्मिती करण्यात आली होती मात्र सध्या इथे होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून मालक मागे फिरत आहेत आणि उद्योग बंद असल्याने सर्व इमारती मोडकळीस येऊन पडल्या आहेत. या भागात नीट लाईस्ट देखील नसल्याने या इमारती रात्रीच्या वेळी भयंकर दिसतात.

होंडा वसाहत एकेकाळी अनेकांसाठी रोजगाराचे साधन होती मात्र आता या वसाहतीची झालेली दुर्दशा कित्येकांना घरी बसण्यास भाग पाडत आहे. या ठिकाणी नवीन उद्योगधंदे सुरु झाल्यास अनेकांना रोजगाराची संधी मिळू शकते असे मत काही उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com