Masorde Sattari: अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे बैलाला जीवदान! मासोर्डे-सत्तरीतील प्रकार; एक तासाहून अधिक वेळ बचावकार्य

Bull Stuck in Drain in Masorde Sattari: मासोर्डे-सत्तरी येथे गटारात अकडलेल्या बैलाला वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच ग्रामस्थांनी अथक परिश्रमाने सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले.
Bull Stuck in Drain in Masorde Sattari
Ox Stuck in Drain in Masorde SattariDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: मासोर्डे-सत्तरी येथे तीर्थस्थान असलेल्या  ठिकाणी  रविवारी (ता.१०) सायंकाळी  गटारात अकडलेल्या बैलाला वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच ग्रामस्थांनी अथक परिश्रमाने सुखरूप  बाहेर काढून जीवनदान दिले.

यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, मासोर्डे येथे आज दुपारपासून बैल गटारात अडकून होता. काही ग्रामस्थांनी दुपारी त्या बैलाला पाहिले होते. मात्र, तो त्या ठिकाणी काही तरी खात उभा आहे, असे समजून कोणी त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

मात्र, सध्याकाळ झाली तरी तो बैल त्याच ठिकाणी असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी पाहिले असता तो बैल त्या गटारात अडकल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांनी  सायंकाळी ७.३० वा.च्या सुमारास अग्निशमन दलाला कळविल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी  धाव घेऊन मदतकार्य करण्यास सुरुवात केली.

मात्र, त्या बैलाला बाहेर काढत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. त्यानंतर सुमारे एक तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी मासोर्डे गावातील ग्रामस्थांनी खासकरून तरुणांनी घटनास्थळी मदतकार्य केले आहे. यावेळी अग्नीशमन दलाचे अधिकारी कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर जवानांनी मदतकार्य केले.

गोवा

Bull Stuck in Drain in Masorde Sattari
'Cash For Job' चे आणखी एक प्रकरण! शिक्षण खात्यात नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक; संशयितास अटक

गुरांचा प्रश्‍न जटिल!

गौरेश गावस म्हणाले, गावात मोठ्या प्रमाणात भटकी गुरे फिरत असतात तसेच रस्त्यावर ठाण मांडून बसतात. ही गुरे कोणाची, ते आम्हाला माहीत नाहीत. अनेकवेळा ही गुरे वाहनांचेही नुकसान करतात तर एकमेकांत रस्त्यावर  भांडतात त्यामुळे जो कोणी मालक आहे त्यांनी आपल्या गुरांची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यानंतर या भटक्या गुरांना गोशाळेत नेण्याची सोय करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com