Goa Drowning Death: दारू पिऊन आंघोळ करायला गेला अन्... वाठादेव बंधाऱ्यात एकाचा बुडून मृत्‍यू

Bicholim Vathadev bandhara drowning incident: आंघोळीसाठी असुरक्षित मानल्या जाणाऱ्या वाठादेव-डिचोली येथील बंधाऱ्यात नौशाद बडीगर (४२) याचा बुडून मृत्यू झाला.

डिचोली : आंघोळीसाठी असुरक्षित मानल्या जाणाऱ्या वाठादेव-डिचोली येथील बंधाऱ्यात नौशाद बडीगर (४२) याचा बुडून मृत्यू झाला. मूळ कर्नाटकचा असलेला नौशाद मजुरीसाठी गोव्‍यातील न्यूवाडा-वाठादेव भागात वास्तव्यास होता. मद्यप्राशन करून तो बंधाऱ्यात उतरला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. श्री महादेव मंदिरामागील बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. पुढील तपास सुरू आहे. नौशाद याच्या मागे पत्नी व दोन लहान मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com