Panaji Protest: 'देवांची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा', हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; पणजी पोलिस मुख्यालयावर धडक मोर्चा

Sanatan Dharma Insult Demand For Arrest: हिंदू देवदेवता आणि सनातन धर्माचा अवमान करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राज्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पणजी पोलिस मुख्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले.
Sanatan Dharma Insult Demand For Arrest
Panaji ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हिंदू देवदेवता आणि सनातन धर्माचा अवमान करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राज्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पणजी पोलिस मुख्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले.

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर, वॉरन आलेमाव आणि गोविंद शिरोडकर यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांना त्वरित गजाआड करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात राज्यभरातून विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये नितीन फळदेसाई, शैलेंद्र वेलिंगकर, गोविंद चोडणकर, जान्हवी प्रभुदेसाई यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता.

Sanatan Dharma Insult Demand For Arrest
Panaji Casino Protest: 'गोव्यातून कॅसिनो हटवा'! पणजीवासियांनी आवळली मूठ; जनआंदोलन, न्यायालयीन लढा सुरु

सकाळी आझाद मैदानावर जमून कार्यकर्त्यांनी हिंदू धर्माविरोधात सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांचा निषेध केला. त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यातील विविध पोलिस स्थानकांमध्ये यासंदर्भात तक्रारी दाखल असूनही पोलिस कारवाई करण्यास विलंब करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जर पोलिस माधव खट्टर आणि गौतम खट्टर यांना तत्परतेने अटक करू शकतात, तर मग हिंदू धर्माचा अवमान करणाऱ्यांना मोकळे का सोडले जात आहे? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी सरकार आणि पोलिस प्रशासनाचा निषेध केला. ज्या तत्परतेने खट्टर बंधूंवर कारवाई झाली, तशीच कठोर कारवाई सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांवरही व्हावी, अशी मागणी करण्यात आली

Sanatan Dharma Insult Demand For Arrest
Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

स्वतंत्र तपास पथक नेमण्याची मागणी

यावेळी बोलताना नितीन फळदेसाई यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक तयार करून हिंदू धर्माविरोधात होत असलेल्या बदनामीच्या प्रकरणांसाठी स्वतंत्र तपास पथक नेमावे, अशी मागणी केली. तसेच हिंदू देवदेवतांच्या आरतीची विटंबना केल्याप्रकरणी गिरीश चोडणकर यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली. तसेच आंदोलकांनी सनातनींना बाणावलीत प्रवेश देऊ नये असे प्रक्षोभक विधान केल्याबद्दल वॉरन आलेमाववर कारवाई आणि सर्वांमध्ये गोयच्या सायबाचा डीएनए आहे असे विधान करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गोविंद शिरोडकर यांना अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com