Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

Goa Fraud case: : राज्यातील ‘बायो इस्टेट सोल्युशन्स’ या कंपनीद्वारे करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.
Goa Fraud
Goa FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील ‘बायो इस्टेट सोल्युशन्स’ या कंपनीद्वारे करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आणि कंपनीचा संचालक शिवाजी वाळके (वय ४८) याला मुंबईतील बोरिवली (पूर्व) येथून अटक करण्यात आली असून त्याला गोव्यात आणले आहे. वाळके हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेत नोंदवण्यात आला आहे. संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२० आणि १२०-बी अंतर्गत फसवणूक, विश्वासाचा भंग आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप आहेत.

तसेच ‘गोवा गुंतवणूकदार हितरक्षण कायदा २०११’ च्या कलम ३ आणि ५ नुसारही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीने अनेक गोमंतकीय रहिवाशांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

स्थानिक न्यायालयाने वाळकेला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलिस त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि या घोटाळ्याच्या संपूर्ण जाळ्याची सखोल चौकशी करणार आहेत. हा तपास पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण, उपअधीक्षक फ्रान्सिस्को कॉर्टे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधीक्षक अर्शी आदिल यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईने केला जात आहे.

Goa Fraud
Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

मुंबईत छापा टाकून कारवाई

तांत्रिक देखरेख आणि गुप्त माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाळकेचा माग काढला. मुंबईत त्याच्या राहत्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले.

Goa Fraud
Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

चार एजंटांना यापूर्वीच अटक

या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या अटकेपूर्वी पोलिसांनी कंपनीच्या चार एजंटांना आधीच अटक केली होती. यामध्ये सुभाष भास्कर धुरी, दिगंबर एन. भट, सारिका दीनानाथ पिळर्णकर आणि सोमा गोविंद गावकर यांचा समावेश असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com