High Court Of Bombay At Goa: तरुण तेजपाल याच्या निर्दोषत्वाला आव्हान

खंडपीठासमोर याचिकेवर 11 एप्रिलला सुनावणी
Tarun Tejpal Case
Tarun Tejpal CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तरुण तेजपाल याच्या निर्दोषत्वाला सरकारने आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुन्हा तहकूब करताना ती आता 11 एप्रिलला ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याने केलेल्या अर्जावर येत्या 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी इन कॅमेरा घेण्याची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Tarun Tejpal Case
बोगदा, जेटी या डोंगराळ भागातील घरमालकांना भय घालणे बंद करा : आमदार आमोणकर

मागील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तरुण तेजपाल याच्या वकिलांना जर सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी सुरू झाली नाही तर येथील सुनावणी सुरू केली जाईल, असे स्पष्ट संकेत देऊन ती आज 30 मार्चपर्यंत तहकूब केली होती. उच्च न्यायालयातील याचिका सुनावणीस आली असता तेजपाल याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात 1 एप्रिलला अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती केली. तेजपालतर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई तसेच गोवा सरकारतर्फे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि त्यांना राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हे मदत करत आहेत. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होणार आहे.

Tarun Tejpal Case
गोव्याचे उपसभापती सुभाष फळदेसाई यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

तेजपाल याने आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेचे गोव्यातील एका हॉटेलमधील महोत्सवात लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार दाखल केला होता. म्हापसा जलदगती न्यायालयाने त्याला पुराव्याअभावी निर्दोषमुक्त केले होते.याचिका आव्हान देण्यास योग्य आहे ?

तेजपालने राज्य सरकारच्या आव्हान याचिकेविरोधात सादर केलेल्या अर्जात ती सुनावणीस घेण्यायोग्य आहे का? असा प्रश्‍न केला असून सुनावणी झाल्यास ती इन कॅमेरा घ्यावी, अशी विनंती केली होती. त्यातील इन कॅमेरासाठीची विनंती उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे, तर निर्दोषत्वाला आव्हान तसेच आव्हान देण्यास ती योग्य आहे का? असा प्रश्‍न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com