बोगदा, जेटी या डोंगराळ भागातील घरमालकांना भय घालणे बंद करा : आमदार आमोणकर

'मुरगाव मतदार संघातील भेडसावत असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवावा'
MLA Sankalpa Amonkar
MLA Sankalpa Amonkardainik gomantak

वास्को : बोगदा, जेटी या डोंगराळ भागातील घरांना पावसाळ्यात घरे खाली करण्याची नोटीस देणे बंद करून या घरमालकांना भय घालणे बंद करा असे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुरगाव मतदार संघातील भेडसावत असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली असून यामुळे त्यांनी मुरगाव वासियांची मने जिंकली. अर्थ संकल्प विधानसभेत उपस्थित केलेल्या लोकांच्या या प्रश्नामुळे आमदार आमोणकर यांचे मुरगावात तसेच सर्व थरातून अभिनंदन होत आहे. (MLA Sankalpa Amonkar demands that the homeowners at bogda, jetti)

मुरगाव मतदार संघात बोगदा या डोंगराळ भाग असून या डोंगराळ भागात शेकडो घरे आहेत. जी पोर्तुगीजकालीन आहेत. मात्र या घरांना वर्षानुवर्षे पावसाळ्यापूर्वी मुरगाव पालिकेतर्फे नोटीस बजावून पावसाळ्यात ही घरे (Houses) खाली करा अशी ताकीद देऊन भयभीत केले जाते. त्यामुळे येथील घर मालकावर पावसाळ्यात जायचे कुठे असा प्रश्न पडतो. नोटीस बजावून एक प्रकारे सरकार आपल्यावरील जबाबदारी झटकत असल्याचाच प्रकार असल्याचे बोलले जाते.

MLA Sankalpa Amonkar
अर्थसंकल्पावरून आमोणकरांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार

दरम्यान मुरगावचे नवनिर्वाचित आमदार संकल्प आमोणकर यांनी आज विधानसभेत (Legislative Assembly) या विषयी प्रश्न उपस्थित करून पालिकेतर्फे या घर मालकांना देण्यात येणारी नोटीस बंद करावी व घरमालकांवर दबाव घालणे बंद करा, असे सांगून सरकारने या घराविषयी उपाय योजना आखावी जेणेकरून ही पोर्तुगीजकालीन (Portuguese) घरे सुरक्षित राहतील, अशी मागणी केली. तसेच मुरगाव मतदार संघात पाण्याचा प्रश्न दीर्घकाळ भेडसावत आहे. याविषयी आपण यापूर्वी आवाज उठवला होता. एक तास पाणी आले तर जास्त. हा पाण्याचाही प्रश्‍न सरकारने सोडवावा अशी मागणी आमदार आमोणकर यांनी विधानसभेच्या (Assembly) अधिवेशनात दुसऱ्या दिवशी केली.

दरम्यान आमदार MLA संकल्प आमोणकर यांनी केलेल्या मागणीला अनुसरून मुरगाव वासीयांनी आमोणकर यांचे अभिनंदन केले आहे. कारण आजपर्यंत कोणत्याही आमदाराने जेटी बोगदा भागातील लोकांच्या घराविषयी प्रश्न उपस्थित केला नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com