Goa Crime: 63 वर्षीय वृद्धेवरील अत्याचार प्रकरणात 28 वर्षीय तरुणाची निर्दोष मुक्तता; पोक्सो कोर्टाचा निकाल गोवा खंडपीठानं फिरवला

Goa High Court: सरकारी पक्ष आरोपीची ओळख पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
Goa Crime
Goa High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिसेंबर २०१९ मध्ये ६३ वर्षीय रिसॉर्ट मालकिणीवर बलात्कार व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पॉक्सो न्यायालयाने २८ वर्षीय लालरिनुंगा लालफाकझुआला याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. आरोपीने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या निवाड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने लालफाकझुआला याची निर्दोष मुक्तता केली.

न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी कनिष्ठ न्यायालयाचा जुलै २०२५ मधील निकाल रद्दबातल ठरविला. सरकारी पक्ष आरोपीची ओळख पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. आरोपी १८ डिसेंबर २०१९ पासून न्यायालयीन कोठडीत होता.

Goa Crime
Goa Crime: खारीवाड्यात खळबळ! कामगारांनीच केला मालकाचा गेम? मच्छिमार बोटमालकाचा मृत्यू नाही तर खून; दोन संशयित फरार

पीडित महिला व आरोपी एकमेकांसाठी अनोळखी होते. कोणतीही ‘टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड’ (ओळख परेड) न झाल्यामुळे न्यायालयात करण्यात आलेली ओळख हा कमकुवत पुरावा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. पीडितेने केवळ आवाजावरून आरोपीची ओळख पटविल्याचा दावा केला होता. मात्र, आरोपी हा ईशान्य भारतातील असल्याने त्या भागातील लोकांच्या बोलीभाषेत साम्य असू शकते.

हे लक्षात घेता केवळ आवाजावरून केलेली ओळख संशयास्पद मानण्यात आली.

आरोपी हा रिसॉर्टमध्ये हाउसकीपिंगचे काम करत असल्याने बेडशीटवर त्याचे डीएनए आढळणे स्वाभाविक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, पीडितेच्या नमुन्यांमधील वीर्याचे डीएनए परीक्षण करण्यात आले नव्हते, असे निरिक्षण नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Adulterous Relationship Judicial Recognition Court
Kashinath Shetye Crime Branch Complaint
Chief Justice Suryakant Abortion Ruling
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com