
Goa trip under 15000: गोवा म्हणजे अनेकांचं आवडतं ठिकाण. दररोजचा कामाचा व्याप आणि ताण दूर करण्यासाठी एक निवांत ट्रिप हवीच असते आणि गोवा ही जागा फॅमिली किंवा मित्रांसोबत जाण्यासाठी सुद्धा योग्य ठिकाण आहे. इथे समुद्रापासून, हिल टॉप, रेस्टॉरंट्स, मंदिरं, वन्यजीव असे अनेक पर्यटनाचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे वैविध्यतेने नटलेल्या या राज्यात फक्त आनंद लुटता येतो. गोव्याला जायचं म्हणजे भरपूर खर्च होईल का असा एक प्रश्न मनात सतावत असतो. चला मग जाऊन घेऊया गोवा आपल्या खिशाला परवडणारा आहे का? गोव्यात सर्वात स्वस्तात फिरता येणारं शहर कोणतं, तीन किंवा पाच दिवसांत गोव्यात काय बघाल?
गोव्याबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकून असाल. गोव्यात भरपूर पर्यटक येतात आणि म्हणूनच गोवा महाग असतो वैगरे. पण लक्षात घ्या यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही केवळ १५ हजार रुपयांमध्ये गोवा मनसोक्त फिरता येतो.
तुम्ही जर का एखादी विकेंड ट्रिप प्लॅन करत असाल तर राहणं, खाणं-पिणं आणि फिरणं याचा खर्च आरामात १५ हजारांमध्ये निघून जातो. मात्र तुम्ही कुठे राहताय, कसं फिरणार आहात यावर पैसे ठरतात. गोव्यात ६००-७०० रुपयांमध्ये राहण्याची व्यवस्था होते आणि बस किंवा स्कुटरने शहर फिरण्याचा आनंद घेता येतो.
खरंतर गोव्यात फिरायला जायची योग्य वेळ ही पावसाळा. यावेळी जास्ती लोकं गोव्याला फिरायला जात नाहीत,त्यामुळे खर्च कमी होतो. जून ते सप्टेंबरच्या काळात गोव्यात पावसाळा अधिक असल्याने पर्यटकांची गर्दी कमी असते आणि मनसोक्त फिरता येतं. पावसाळ्यात गोवा हिरव्या-निळ्या रंगात बुडून जातो. जागोजागी वाहणारे धबधबे, ओहोळ आणि भरून वाहणाऱ्या नद्या या राज्याची खासियत आहेत.
गोवा आणि कोकण राज्यात पाऊस तसा सारखाच, सोयाबीतच मोरांचा आवाज, मातीचा वास आणि वाहणारं थंडगार वारं मनाला शांतता देऊन जातं. हा काळ जरी पर्यटकांचा नसला तरीही पावसाळा किती आहे याचा अंदाज घेऊनच तुमची ट्रिप प्लॅन करायला घ्या किंवा मग एप्रिल किंवा मे महिन्यात गोव्याला नक्कीच भेट देता येते.
तुम्ही जर का तीन किंवा पाच दिवसांच्या ट्रिपचा विचार करत असाल तर लक्षात घ्या तुमचा निर्णय अत्यंत योग्य आहे. तीन दिवस गोवा फिरायचा असेल तर एका माणसाचा खर्च आरामात १० हजारात निघून जातो तर पाच दिवसांचा खर्च १८ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असते. गोव्यातील स्थानिक चव चाखायची असेल तर ३०० रुपयांपर्यंत लज्जादर जेवणाचा आस्वाद घेता येतो. गोव्यात रेंटवर गाड्या मिळतात, ज्याचा खर्च ३००-४०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असते, त्यामुळे कमी खर्चात गोवा फिरण्याच्या विचारात असाल तर बिनघोर राहा. शिवाय ट्रिपच्या वेळी पैसे वाचवायचे असल्यास तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.