
गोवा हा केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि पार्टींचा आनंद घेण्यासाठी म्हणून प्रसिद्ध नाही, तर येथील खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसौंदर्य देखील तितकंच अप्रतिम आहे. पर्यटकांना नेहमीच गोव्याबद्दल अनेक प्रश्न पडतात की इथं काय खायचं, कुठं फिरायचं, कोणती भाषा बोलली जाते... चला तर मग, पाहूया गोव्यातील खास गोष्टी.
गोव्याची खाद्यसंस्कृती ही पोर्तुगीज आणि कोकणी प्रभावाने भरलेली आहे. येथे खवय्यांसाठी अनेक खास पदार्थ उपलब्ध आहेत. काही प्रसिद्ध गोमंतकीय पदार्थ खाली दिले आहेत.
पोई आणि भाजी – स्थानिक पोर्तुगीज शैलीतील भाकरीसारखे पोई आणि मसालेदार भाजी
फिश करी-राईस – गोव्याच्या किनारपट्टीवर मिळणारा प्रसिद्ध आणि रोज खाल्ला जाणारा जेवणाचा प्रकार
विंदालू – पोर्तुगीज प्रभाव असलेले मांसाहारी पदार्थ
बेबिंका – सात थरांचा खास गोमंतकीय गोड पदार्थ, विशेषतः सणांमध्ये
फेणी – काजू किंवा नारळापासून बनवलेली पारंपरिक मद्यपेय
पणजी आणि म्हापसा ही गोव्यातील महागडी शहरे मानली जातात. पणजी ही गोव्याची राजधानी असून येथे प्रशासकीय कार्यालये, उच्च दर्जाची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रिअल इस्टेट प्रॉपर्टी खूप महाग आहेत.
पणजी ही गोव्याची राजधानी आहे. ती मांडवी नदीच्या काठी वसलेली असून, येथे गोवा विधानसभेचे कार्यालय, प्रमुख प्रशासकीय इमारती, शिक्षण संस्था आणि पर्यटन केंद्रे आहेत.
गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीने एक आकर्षक ठिकाण मानलं जातं. येथे बागा, कळंगुट, वागातोर आणि हणजूणसारखे प्रसिद्ध किनारे पर्यटकांना भुरळ घालतात.
तसंच येथील निसर्गसौंदर्य, वॉटर स्पोर्ट्स आणि बीच पार्टीजमुळे हा भाग विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गोवा खालील गोष्टींसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
समुद्रकिनारे: कळंगूट, बागा, हणजूण, पाळोले, मिरामार हे जगप्रसिद्ध बीच
नाईटलाइफ: क्लब्स, कॅसिनो आणि नाईट मार्केटमुळे गोवा 'पार्टी डेस्टिनेशन' बनले आहे
इतिहास आणि वास्तुकला: चर्च, मंदिरे, किल्ले आणि पोर्तुगीज शैलीतील वाडे
खाद्यसंस्कृती: सी-फूड आणि स्थानिक खास व्यंजन
फेस्टिवल्स आणि कला: गोवा कार्निव्हल, सिनेमा फेस्टिवल्स, संगीत महोत्सव
बेळगाव: हे शहर कर्नाटक राज्यात येते आणि गोव्याच्या सीमेला लागून आहे. गोव्यातील पेडणे, सांगे आणि खानापूर मार्गे बेळगावला पोहोचता येते. हे शहर गोव्यापासून साधारणतः १०० ते १२० किलोमीटर अंतरावर आहे आणि रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ३ ते ४ तासांचा कालावधी लागतो.
बेळगाव हे व्यापार, शिक्षण आणि उद्योगधंद्यांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथे अनेक शैक्षणिक संस्था, तांत्रिक महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी युनिव्हर्सिटीज आहेत.
कोकण: याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग हे ठिकाण देखील गोव्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड, कुडाळ यासारखी ठिकाणं गोव्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला, समुद्रकिनारे आणि मालवणी खाद्यसंस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात.
गोवा लहान असला तरी पाहण्यासारख्या अनेक ठिकाणांनी भरलेला आहे. पर्यटकांनी खालील प्रमुख ठिकाणी नक्की भेट द्यावी.
उत्तर गोवा: बागा, कळंगूट, वागातोर, हणजूण, आग्वाद किल्ला, शापोरा किल्ला
दक्षिण गोवा: पाळोले, कोलवा, बेनालि
ऐतिहासिक ठिकाणे: चर्चेस ऑफ ओल्ड गोवा, बोम जेझस चर्च, से कॅथेड्रल
निसर्ग स्थळे: दूधसागर धबधबा, सलीम अली पक्षी अभयारण्य, बोंडला अभयारण्य
गोव्यातील प्रमुख भाषा म्हणजे कोंकणी. कोंकणी भाषा राज्याची अधिकृत भाषा आहे. याशिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा देखील गोव्यात मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.