Heavy Rain: सत्तरीत शेतकरीवर्ग चिंताग्रस्त; भातकापणीवर पावसाचे सावट

Heavy Rain in Goa: काणकोणात पावसामुळे भातशेतीचे नुकसान
Heavy Rain in Goa
Heavy Rain in GoaDainik Gomantaj
Published on
Updated on

Heavy Rain in Goa: काणकोण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. आगोंद येथेही तयार झालेली भातशेती पावसामुळे आडवी झाली आहे.

यासंदर्भात विभागीय साहाय्यक कृषी अधिकारी सर्वानंद सवर्णकर यांच्याशी संपर्क साधला असता बुधवारपर्यंत नुकसानभरपाईसाठी एकही अर्ज आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Heavy Rain in Goa
Heavy Rain In Goa: कारापूर येथे लोकवस्तीत कोसळली वीज

सत्तरीत सध्या अवकाळी पावसामुळे भातशेती धोक्यात आली आहे. ऐन भातकापणीवेळी पावसाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

यंदा पावसाळा एक महिना उशिरा सुरू झाल्यामुळे शेतीकामे उशिरा सुरू झाली होती.त्यानंतर समाधानकारक असा पाऊस पडल्याने शेतीला मुबलक असे पाणी मिळाले होते.

गेल्या आठ दिवसांपासून सत्तरीतील विविध भागात भात कापण्यास सुरवात झालेली आहे. तर काही ठिकाणी अजून भातकापणी करायची बाकी आहे.

गेल्या आठवड्यात अचानक पाऊस पडायला लागला त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. अर्धवट कापलेले भात कापण्याचे काम बंद करण्यात आले होते. मंगळवारपासून पुन्हा शेतकऱ्यांनी भात कापण्यात सुरवात केली होती.

Heavy Rain in Goa
Sal River: साळ नदी किनाऱ्यावरील पबचे ‘ते’ बांधकाम पाडा!

नुकसानभरपाई देण्याची मागणी!

गेली अनेक वर्षे काणकोणमधील भातशेतीला परतीच्या पावसाचा फटका बसतो. कृषी खात्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी खोतीगावच्या दया ऊर्फ उमेश गावकर यांनी केली आहे.

झाड पडून हानी

बुधवारी सायंकाळी ६ वाजता वाळपई सिटी हाॅल येथे मुविना खान यांच्या घरावर शेगलाचे झाड पडून पाच हजारांचे नुकसान झाले आहे.

यावेळी वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले व सुमारे ५० हजारांची मालमत्ता वाचविली.

मशीन उपलब्ध करून द्यावे

सत्तरीत गेल्या दोन वर्षांपासून अनेकजण शेतीकडे वळू लागले आहेत. त्यात आता तंत्रज्ञानाच्या युगात कामगार शेतात काम करणेही मुश्‍कील झाले आहे.

त्यातील बार्देशसारख्या भागात अनेक शेतकरी भातकापणी मशीनच्या साहाय्याने कापणी करतात. मात्र, सत्तरीत अशाप्रकारे मशीन नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com