Sal River: साळ नदी किनाऱ्यावरील पबचे ‘ते’ बांधकाम पाडा!

Sal Riverside Illegal Pubs: खंडपीठाचा आदेश : उपसंचालक, बीडीओंची चौकशी
Sal Riverside Illegal Pubs
Sal Riverside Illegal PubsDainik Gomantak
Published on
Updated on

Sal Riverside Illegal Pubs: केळशी पंचायत क्षेत्रामधील पर्यावरण संवेदनशील भागात ‘एनडीझेड’च्या सर्वे क्रमांक 106/3 मधील साळ नदीपात्रात अतिक्रमण करून केलेले कथित बेकायदा पब तथा पार्टी स्थळाचे बांधकाम पाडण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.

Sal Riverside Illegal Pubs
Goa Rain Update: अवकाळीने उडवली दाणादाण

या बांधकामाविरोधात कारवाई कऱण्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दक्षिण गोव्यातील पंचायत उपसंचालक तसेच गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देशही पंचायत संचालकांना दिले आहेत.

साळ नदीच्या काठावरील बार ॲॅण्ड रेस्टॉरंट्स तथा पबच्या कथित बांधकामप्रकरणी याचिकादार मारिया आगुस्तिन फ्रान्सिस फर्नांडिस यांनी पंचायतीकडे 12 जून 2023 रोजी तक्रार दाखल केली होती.

या बांधकामविरोधात कारवाई करण्याऐवजी प्रत्येक सरकारी यंत्रणा आपल्यावरील जबाबदारी झटकून दुसऱ्याकडे ढकलत होती. कारवाई करण्यास पंचायत उपसंचालक व गटविकास अधिकाऱ्यांनी विलंब केला.

त्याचबरोबर बांधकाम बंद करण्याचे निर्देश देऊन पुढील कोणतीच कारवाई केली नाही. या बेकायदा बांधकामाकडे दुर्लक्ष करून त्याला ते पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले, असे प्रथमदर्शनी दिसून येते.

Sal Riverside Illegal Pubs
Goa Politics: ई-खनिज लिलावावरून वाक्‌युद्ध: रिव्हॉल्युशनरी गोवन्सकडून सरकारवर टीकास्त्र

बेकायदा बांधकाम केलेल्या केळशी येथील जेम्स बार्रेटो आणि सुझान बार्रेटो यांनी बांधकामासाठी एप्रिल 2023 मध्ये अर्ज केल्यानंतर ‘जीसीझेडएमए’ने मे 2023 मध्ये तपासणी केली होती. या तपासणीनंतर परवानगी मिळण्याआधीच या बांधकामाला जून 2023 रोजी सुरवात केली.

बार्रेटो यांनी परवान्यासाठी शुल्कही 30 ऑक्टोबर 2023 रोजी जमा केले होते. परवान्याचा आदेश ‘जीसीझेडएमए’च्या सदस्य सचिवांच्या सहीमुळे अडला होता. ही माहिती समोर येताच खंडपीठानेही आश्‍चर्य व्यक्त केले.

याचिकेत या बांधकामाबाबत सादर केलेल्या छायाचित्रांनुसार साळ नदीत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे स्पष्ट होते.

जीसीझेडएमए अधिकाऱ्यांना तपासणी करताना हे कसे काय आढळून आले नाही, याबाबत खंडपीठाने आश्‍चर्य व्यक्त केले. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात कोणत्याच बांधकामाला परवाना देता येत नाही, असे ॲडव्होकेट जनरल यांचे म्हणणे आहे.

या बेकायदा बांधकामाविरुद्ध ‘जीसीझेडएमए’ने त्वरित कारवाईसाठी पावले उचलण्याची गरज होती. बांधकामाला तात्पुरता परवाना देण्याचा निर्णय झाला असताना छायाचित्रांनुसार हे बांधकाम सिमेंट काँक्रिटने पक्के बांधण्यात आले आहे.

त्यामुळे यासंदर्भात जीसीझेडएमए सदस्य सचिवांनी स्पष्टीकरण सादर करावे तसेच त्यासंदर्भातील फाईल्स सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. न्यायालयात उपस्थित असलेल्या बेकायदा बांधकाममालक बार्रेटो यांनी हे बांधकाम स्वतःच पाडण्याची हमी दिली.

गुरुवार, 9 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बांधकाम पाडण्यास सुरवात करण्यात येणार आहे, तेव्हा जीसीझेडएमएच्या अधिकाऱ्यांनी तेथे देखरेखीसाठी उपस्थित राहावे, असेही आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com