Vasco: वास्कोतील कचरा पाठवणार काकोड्यात! मुरगाव पालिकेचा निर्णय; सरकारला करणार विशेष अनुदानाची विनंती

Mormugao: ओल्या कचऱ्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो यासाठी हा कचरा काकोडा येथील कचरा प्रकल्पात पाठविण्याचा एकमुखी निर्णय मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Waste Management
Garbage CollectionCanva
Published on
Updated on

वास्को: ओल्या कचऱ्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो यासाठी हा कचरा काकोडा येथील कचरा प्रकल्पात पाठविण्याचा एकमुखी निर्णय मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

तथापि, मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महिन्याकाठी सुमारे बारा लाख रुपये कचऱ्यापायी काकोडा येथील घन कचरा व्यवस्थापनाला देण्यास मुरगाव पालिका असमर्थ आहे. त्यामुळे सरकारने मुरगाव पालिकेला विशेष अनुदान द्यावे, अशी विनंती करण्यात येणार आहे.

घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने मुरगाव पालिकेसह इतरांकडून साळगाव कचरा प्रकल्पात ओला कचरा स्वीकारणे तात्काळ बंद केल्याने मुरगाव पालिका अडचणीत आली आहे.

याप्रकरणी योग्य तोडगा काढण्यासाठी मुरगाव पालिका मंडळाची गुरुवारी (ता. १८) आपत्कालीन बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक तसेच इतर नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गिरिष बोरकर, सिध्दीविनायक नाईक यांनी सद्यस्थिती बैठकीत मांडून कचऱ्याच्या हाताळवणीवर त्वरित तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. सडा कचरा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात ओला कचरा जमा झाल्यास त्याचा परिणाम आसपासच्या नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

Waste Management
Goa Garbage Collection: कंत्राटदारांमार्फत संकलन केल्याने गोव्यातील कचरा प्रश्नाचा गुंता सुटणार आहे का?

साळगाव येथे ओला कचरा स्वीकारण्यास गोवा घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने नकार दिला आहे. त्यामुळे हा कचरा काकोडा येथील घन कचरा व्यवस्थापन सुविधाच्या कचरा प्रकल्पात नेण्यात येणार आहे.

तथापि, त्यासाठी मुरगाव पालिकेला महिनाकाठी सुमारे बारा लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. काकोडा कचरा प्रकल्पात कचरा नेण्यासाठी दहा टन क्षमतेच्या वाहनाचा वापर केला पाहिजे. मुरगावच्या कचरा प्रकल्पात प्रतिदिन सुमारे सोळा टन ओला कचरा जमा होतो. सोळा टन कचरा नेण्यासाठी काकोडा कचरा प्रकल्पामध्ये वाहन उपलब्ध नाही.

Waste Management
Garbage Plant Visit: विद्यार्थ्यांनी केला 'कचरामुक्तीचा' संकल्प! राणे हायस्कूलची डिचोली प्रकल्पाला भेट

मुरगाव पालिकेच्या वाहनाची गरज

आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे मुरगाव पालिकेने साळगाव येथे ओला कचरा वाहून नेण्यासाठी सोळा टन क्षमतेचे वाहन महिन्याभरापूर्वी विकत घेतले होते. त्यामुळे साळगाव येथे एका फेरीमध्ये कचरा नेता येत होता. त्याचप्रमाणे ओल्या कचऱ्यातील घाण पाणी रस्त्यावर पडू नये यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. ते पाणी छोट्याशा टाकीमध्ये जमा होत असे, परंतु आता मुरगाव पालिकेला कचरा नेण्यासाठी काकोडा कचरा प्रकल्पाचे वाहन वापरले पाहिजे. ते वाहन दहा टन कचरा वाहून नेते. त्यामुळे मुरगाव पालिकेच्या सोळा टन कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाचा उपयोग करण्याची गरज आहे. अन्यथा ते वाहन विनावापर खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com