Weather Update: उष्‍मा वाढला, प्रतीक्षा माॅन्सूनची; शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

शिक्षण खात्‍याचा आदेश : विद्यार्थी-पालकांच्या मागणीची दखल
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Weather Update लांबलेला मॉन्सून आणि वाढलेला उकाडा या पार्श्वभूमीवर शाळांचे वर्ग कमी करावेत किंवा शाळा बंद ठेवाव्यात अशी पालक, राजकीय पक्ष आणि बिगर शासकीय संस्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन अखेर शिक्षण खात्याने उद्या शनिवारी (ता. 10) शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केवळ उद्या (ता. 10) रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली असून पाऊस अधिक लांबला, तर सरकार आणि शिक्षण संचालनालयाची भूमिका काय असेल हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Weather Update
Goa Weather Update : येत्या 3 ते 4 तासांत गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काढलेल्या आदेशानुसार, शनिवार, १० जून रोजी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहतील. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असे शिक्षण संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

पुरवणी परीक्षा आज

दरम्‍यान, गोवा माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्‍यात येणारी जूनची पुरवणी परीक्षा जाहीर केलेल्‍या नियोजनाप्रमाणेच होईल. उमेदवारांनी 10 जूनला वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रांवर पोहोचावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Weather Update
Saligao Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी संशयितास अटक; साळगाव पोलिसांची कारवाई

वातावरणातील बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या असह्य आणि मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. तसेच 7 जूनला येणाऱ्या मॉन्सूनचे आगमनही 4 ते 5 दिवस लांबणीवर पडले आहे.

आता 13 जूनच्या दरम्यान मॉन्सून राज्यात दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पालकांमधूनही शाळा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते. आता शिक्षण संचालनालयाने घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला आहे.

Weather Update
Vasco Fire News : हेडलॅण्ड सडा येथे टार मशीनला आग

सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित, विनाअनुदानित शाळा, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विशेष शाळा आणि ज्युनिअर कॉलेज शनिवारी बंद राहतील. या संस्थांच्या प्रमुखांना तसे आदेश देण्यात आले आहेत. सर्व शिक्षण संस्थांनी भविष्यात या सुट्टीच्या दिवसाची भरपाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

अखेर मागणी मान्य

वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने शाळा, महाविद्यालयाचे वर्ग कमी करावे, अन्यथा बंद करावेत, अशी मागणी एनएसयुआयने सर्वप्रथम केली होती. त्यानंतर पालक-शिक्षक संघटनांनी शिक्षण संचालकांची भेट घेऊन याच मागणीचे निवेदन दिले होते.

त्याशिवाय अनेक पालकांनी संबंधित शाळा व्यवस्थापनांना वर्गांची वेळ कमी करण्याची विनंती केली होती. या वाढत्या दबावाला अनुसरून राज्य सरकारला एक दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

एनएसयूआयचा विजय

उष्णतेचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याने शाळा, महाविद्यालयांना काही दिवस सुट्टी देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी एनएसयुआयने मुख्यमंत्री आणि शिक्षण संचालकांकडे केली होती.

अखेर सरकारने आमची मागणी मान्य केल्याने आमचा विजय झाला आहे, असा दावा करणारे ट्विट एनएसयूआयने समाज माध्यमांवर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com